Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंत्रालयातील काम आता दोन शिफ्ट्समध्ये!

कार्यालयीन वेळांचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश

February 26, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
uddhav thackeray -111

  • वर्क फ्रॉम होमची परिणामकारक यंत्रणा निर्माण करावी
  • मंत्रालयीन सर्व कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण

 

मुक्तपीठ टीम

 

कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राचे मंत्रालय दोन शिफ्ट्समध्ये कार्यरत होण्याची शक्यता आहे.

            राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची यावेळी उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, आपण या  नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे.

 

मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

            वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

 

अभ्यागतांना मर्यादित प्रवेश

            मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक- दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

 

आरोग्य तपासणी

            मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.


Tags: cm uddhav thackeraymantralayamantralaya in 2 shiftsमंत्रालयमंत्रालय दोन शिफ्टमध्येमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचं* : 1. ‘मुंबई सागा’ हा गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वावर अनेक चित्रपट बनले आहेत. आता त्या आधारित पुन्हा एक नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच समोर आली आहे. 2. अभिनेत्री करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर सोशल मीडियावर पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. आज करीनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3. सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलिस’चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात सैफसोबत, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार पाहाण्यास मिळणार आहेत. जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केले आहे. १० सप्टेंबरला हासिनेमा रिलीज होणार आहे. 4. सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन कपिल शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नुकतीच कपिल शर्माने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘माझी तब्बेत ठिक आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना पाठिला दुखापत झाली आहे. मी काही दिवसांमध्ये ठिक होईन’ असे उत्तर दिले. 5. महाभारतातील एक वीर योद्धा कर्ण यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टायटल लोगो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी यानी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हा लोगो शेअर केला आहे.

Next Post

राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next Post
राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!