मुक्तपीठ टीम
आज राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन…यादिवशी बहिणी भावाला ओवाळून राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. तर भाऊराया देखील बहिणीला आयुष्यभर संरक्षणाचे वचन देतात. यामुळे रक्षाबंधनच्या सणाला विशेष महत्त्व असते. या दिवशी देवी लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली होती. उत्तराखंडमधील चमोली येथे असे एक मंदिर आहे, जे केवळ रक्षाबंधनाच्या निमित्ताने भक्तांसाठी उघडले जाते. हे मंदिर भगवान बंसी नारायणाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात वर्षातून फक्त एक दिवस पूजा केली जाते. उत्तराखंडमध्ये या मंदिरासंबंधित काही रंजक माहितीही जाणून घेऊया.
बंसी नारायण मंदिराचं वेगळंपण…
- या मंदिराचे नाव बंसी नारायण मंदिर असून ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील उरगम खोऱ्यात आहे.
- रक्षाबंधनाला या मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडतात.
- रक्षाबंधनाच्या दिवशी आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या महिला भगवान बंशी नारायण यांना राखी बांधतात.
- यानंतरच भावांना राखी बांधली जाते आणि सूर्यास्तानंतर मंदिराचे दरवाजे पुन्हा वर्षभरासाठी बंद केले जातात.
- येथे भगवान श्रीकृष्ण आणि कल्याणकारी शिवाच्या मूर्ती आहेत.
- या मंदिरापर्यंत जाण्यासाठी उरगम खोऱ्यातील लोकांना सात किलोमीटर पायी चालत जावे लागते.
- मंदिराच्या अंगणात श्रीगणेशाच्या आणि वनदेवतांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत.
रक्षाबंधनाची पौराणिक श्रद्धा
- या मंदिराशी संबंधित पौराणिक कथेनुसार, देवऋषी नारद येथे वर्षातील ३६४ दिवस भगवान विष्णूची पूजा करतात, त्यामुळे या मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद असतात.
- या मंदिरात केवळ एक दिवस पूजा करण्याचा अधिकार मानवाला मिळतो, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे उघडतात.
- एका पौराणिक कथेनुसार, राजा बळीने भगवान विष्णूंना आपला द्वारपाल बनण्याची विनंती केली होती.
- राजा बळीची विनंती मान्य करून श्रीहरी पाताललोकात गेले.
- अनेक दिवस भगवान विष्णू न दिसल्याने माता लक्ष्मी खूप चिंतित झाली आणि त्यांनी नारदजींना विष्णूजीबद्दल विचारले.
- आईने विचारल्यावर नारदांनी सांगितले की ते अधोलोकातील राजा बळीचा द्वारपाल आहेत
- त्यावेळी माता लक्ष्मी भगवानांना मुक्त करण्यासाठी अधोलोकात पोहोचली आणि राजा बळीला रक्षासूत्राचे वचन घेऊन भगवान विष्णूंना मुक्त केले.
- त्यानंतर भगवान विष्णू अधोलोकातून परतले, तेव्हापासून देवाला राखी बांधण्याची परंपरा सुरू आहे, असे मानले जाते.
मंदिरातील एका दिवसाच्या पुजेची कथा…
- जेव्हा माता लक्ष्मीने त्यांना परत आणण्याचा मार्ग विचारला तेव्हा नारद मुनींनी सांगितले की श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला अधोलोकात जाऊन राजा बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे.
- रक्षासूत्र बांधल्यानंतर राजा बळीला श्रीहरी परत करण्यास सांगा.
- असे म्हणतात की माता लक्ष्मीला अधोलोकाचा मार्ग माहित नव्हता, म्हणून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नारद मुनी तिच्यासोबत अधोलोकात गेले.
- त्यांच्या अनुपस्थितीत एके दिवशी कालगोठ गावच्या पुजार्याने भगवान बंसीनारायणांची पूजा केली.
- तेव्हापासून या मंदिराचे दरवाजे फक्त रक्षाबंधनाच्या एका दिवसासाठी सामान्य भाविकांसाठी उघडले जातात आणि लोक रक्षाबंधनाला त्यांची पूजा करतात असे म्हणतात.
कशी केली जाते पूजा?
- रक्षाबंधनाच्या दिवशी कालगोठ गावातील प्रत्येक घरातून भगवान नारायणासाठी लोणी येते.
- त्या लोण्यापासून प्रसाद तयार केला जातो.
- या मंदिरात श्रावण पौर्णिमेला भगवान नारायण यांचा श्रृंगारही केला जातो.
- त्यानंतर गावातील लोक भगवान नारायणांना रक्षासूत्र बांधतात.
- मंदिरात पुजारी असतात.
बंसीनारायण मंदिरात दर्शनाला जायचंय? हा आहे मार्ग…
- हे मंदिर फक्त रक्षाबंधन सणालाच दर्शनासाठी उघडं असतं, हे लक्षात ठेऊनच प्रवासाचं नियोजन करा.
- उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील उरगम खोऱ्यात बंसी नारायण मंदिर आहे.
- उत्तराखंडमधील डेहराडूनपासून २९३ किमी अंतरावरील जोशीमठला जावे लागते.
- जोशीमठपासून २२ किमी अंतरावर असलेल्या हेलांगकडे पहिला टप्पा.
- त्यानंतर हेलांगपासून १५ किमी अंतरावर असलेल्या देवग्रामला दुसरा टप्पा.
- त्यानंतर १२ ते १५ किमी पायी चालावं लागतं.
- बंसी नारायण मंदिराचा ट्रेक देवग्रामपासून सुरू होतो.