मुक्तपीठ टीम
सीमा सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) साठी एकूण ९८२ जागा तर हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) साठी ३३० जागा. अशा एकूण १३१२ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार
१) हेड कॉन्स्टेबलसाठी (रेडिओ ऑपरेटर)
- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी उत्तीर्ण असावी.
- उमेदवार रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयार करणे आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटर २ वर्षे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) किंवा १२वी PCM सह ६०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)
- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी उत्तीर्ण असावी.
- टेलिव्हिजन किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयार करणे आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिट किंवा इन्फो टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स किंवा कॉमन इक्विपमेंट मेंटेनन्स किंवा कॉमन इक्विपमेंट मेंटेनन्स किंवा २ वर्षाचे संगणक ITI ची प्रमाणपत्रे घेतली असावे.
- नेटवर्क टेक्निशियन किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरसाठी १२वी PCM सह ६०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि २५ वर्ष असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://rectt.bsf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करा
http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_19110_57_2223b.pdf