Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टार्ट-अप आणि एमएसएमईना सहा महिन्यांसाठी स्वदेशी 5G टेस्ट बेडचा मोफत वापर! कसं ते जाणून घ्या…

August 11, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Indigenious 5G Test Bed

मुक्तपीठ टीम

भारतात 5G परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने आणि आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, केंद्र सरकारने सरकार मान्यताप्राप्त स्टार्ट-अप आणि एमएसएमईसाठी पुढील सहा महिन्यांकरिता जानेवारी २०२३ पर्यंत स्वदेशी 5G टेस्ट बेड मोफत वापरायला देण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर सर्व हितधारकांसाठी अगदी नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व 5G हितधारकांना म्हणजे उद्योग, शैक्षणिक संस्था, सेवा प्रदाते, संशोधन आणि विकास संस्था, सरकारी संस्था, उपकरणे उत्पादकांना त्यांच्या नेटवर्कमध्ये जलद विकास आणि उत्पादने तैनातीसाठी 5G टेस्टबेड सुविधा आणि कौशल्य वापरण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक 5G टेस्ट बेड वापरण्यासाठी वेब पोर्टल https://user.cewit.org.in/5gtb/index.jsp द्वारे अर्ज करू शकतात.

भारताच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आणि 5G वापरात अग्रेसर राहण्यासाठी दूरसंचार विभागाने मार्च, २०१८ मध्ये भारतात ‘स्वदेशी 5G टेस्ट बेड’ स्थापित करण्यासाठी बहु-संस्थात्मक सहकार्य प्रकल्पासाठी २२४ कोटी रुपये खर्चासह आर्थिक अनुदान मंजूर केले. या प्रकल्पातील आठ सहयोगी संस्था – आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मुंबई , आयआयटी कानपूर, आयआयएससी बंगळुरू , सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी, या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मे २०२२ रोजी स्वदेशी 5G टेस्ट बेड राष्ट्राला समर्पित केले होते. टेस्ट बेडच्या वापरासाठी एक वेब आधारित पोर्टल (https://user.cewit.org.in/5gtb/index.jsp) देखील विकसित केले आहे.

या स्वदेशी टेस्ट बेडचा विकास 5G तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि 5G आत्मनिर्भर भारताकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. हे टेस्ट बेड भारतीय स्टार्ट-अप, एमएसएमई , शैक्षणिक आणि उद्योग वापरकर्त्यांद्वारे विकसित आणि उत्पादित 5G उत्पादनांच्या चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी स्वदेशी क्षमता पुरवते. यामुळे खर्चात कपात आणि डिझाइनचा वेळ कमी झाला आहे ज्यामुळे भारतीय 5G उत्पादने जागतिक स्तरावर बाजारपेठेत स्पर्धात्मक बनतील अशी अपेक्षा आहे.

पाहा:


Tags: 5G Test Bed5G टेस्ट बेडcentral govtGood news MorningMSMEsameerstart upएमएसएमईकेंद्र सरकारगुड न्यूज मॉर्निंगस्टार्ट अप
Previous Post

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन १८५७ ते १९४७ कालखंडातील दुर्मिळ छायाचित्रांचं अमरावतीत प्रदर्शन

Next Post

नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

Next Post
Maharashtra StartUp Yatra

नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!