मुक्तपीठ टीम
पंजाब नॅशनल बँकेत शिपाईपदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा केवळ १२ वी उत्तीर्ण असावा. इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक.
वयोमर्यादा
०१ जानेवारी २०१ रोजी १८ ते २४ वर्षे. एससी, एसटीसाठी ०५ वर्षे सूट, तर ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, ९१७/ २०-२०-ए, पहिला मजला, ओबीसी टॉवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र – ४११००४
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
पंजाब नॅशनल बँकच्या अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.
या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
पाहा व्हिडीओ: