मुक्तपीठ टीम
राष्ट्र सेवा दल-संविधान साक्षरता अभियानाच्यावतीने ‘घरोघरी संविधान’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून रविवारी संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळा आयोजित कऱण्यात आली आहे. रविवारी ७ ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील स्व. बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स येथे नाशिक जिल्हा स्तरीय संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळा आयोजित केली आहे. सकाळी ११.४५ वाजता या कार्यशाळेचे उदघाटन होणार असल्याची माहिती निमंत्रक शरद शेजवळ यांनी दिली आहे.
भारतीय संविधान निर्मिती पूर्व इतिहास-संविधान निर्माण प्रक्रिया,संविधान सभेची स्थापना,मसुदा समितीचे कार्य, भारतीय संविधानाची उद्देशिका,संविधानाने भारतीयांना काय दिले ? भारतीय संविधान संवर्धन-प्रचारक होणे व “हर घर संविधान” घेऊन जाण्याची गरज,संविधान संवर्धन व प्रचार-प्रसार/ भारतीयांच्या जबाबदाऱ्या या बद्दल सदर कार्यशाळेत मार्गदर्शन होणार असून भारतीय संविधानाप्रति आपली बांधीलकी व हक्क अधिकाराबद्दल जाणीव जागृती अधिक दृढ करण्याकरता संविधान संवर्धक व हर घर संविधान उपक्रमात सहभागी होण्याकरता एक दिवसीय संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेत सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागा करता पुढील लिंकवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लिंक https://forms.gle/1fsaZ7fT6q3mqhHN8
सदर उपक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक राष्ट्र सेवादल जिल्हा प्रमुख दिनकर दाणे राहणार आहेत स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगांव बसवंत चे प्राचार्य दिनेश अनारसे अध्यक्षस्थानी आहेत.कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक संविधान संवर्धक,संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे महेंद्र गायकवाड करतील अशी माहिती निमंत्रक संविधान संवर्धक,संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे शरद शेजवळ सर यांनी दिली आहे.सहभागी होण्यासाठी फोन संपर्क 9822645706
आपला विश्वासू
प्रा.शरद शेजवळ
(निमंत्रक – संविधान संवर्धक,संविधान साक्षरता-संवर्धन अभियान)