वेळीच मदत मिळाल्यानं बीडच्या एका लहानग्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करता आलीय. त्याचे प्राण वाचलेत. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून वेळीच मदत मिळाल्यानं या चिमुकल्याचे प्राण वाचलेत. बीड जिल्ह्यातील गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या वैभव शिवाजी वावळकर यांच्या ८ महिन्याच्या लहानग्यावर हृदय शस्त्रक्रियेची गरज होती. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च कसा करायचा असा प्रश्न वावळकरांना सतावत होता. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सहकार्य करत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत २ लाख ३४ हजारांचा निधी उपलब्ध झाला.
मुंबई येथील एस.आर.सी.सी. चिड्रन्स हॉस्पिटलमध्ये चिमुकल्या शौर्यमनची हृदयाची किचकट शस्त्रक्रिया त करण्यात आली. महागडी शस्त्रक्रिया केवळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे झाली अशी प्रतिक्रिया शौर्यमनच्या आईवडिलांनी दिली आहे.
बीड येथील अपेक्स हॉस्पिटलचे डॉ. जावेद यांच्या सल्ल्यानुसार शौर्यमनच्या हृदयाची शस्त्रक्रिया एस.आर.सी.सी. चिड्रन्स हॉस्पीटल मुंबई येथे डॉ. सुप्रतीम सेन यांनी यशस्वी केली. डॉ. सुप्रतीम सेन हे देश पातळीवर हृदय आणि बालरोग तज्ञ म्हणून ओळखले जातात.