मुक्तपीठ टीम
सरकारने ५जी सेवेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आयएमटी/ ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला परवानगी दिली आहे. ५जी सेवा सध्याच्या ४जी सेवेपेक्षा १० पट अधिक वेगवान असेल. अशा परिस्थितीत ५जी सेवा देणाऱ्या कंपनीची चांगली कमाई होणार आहे आणि याचा लोकांनाही फायदा होणार आहे.
सामान्य लोकांच्या मनात ५जी स्मार्टफोनसंबंधित काही शंका!
- लोकांना असं वाटत आहे की ५ जी आल्यावर ४जी स्मार्टफोन बंद होतील परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ५जी आल्यानंतर ४जी फोन बंद होणार नाही.
- ५जी येणे हे केवळ नेटवर्कचे अपग्रेड आहे.
- सुरुवातीला ते फक्त ४जी नेटवर्कवर अवलंबून असेल. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण ४जी फोन बंद होणार नाही.
- तसेच ५जी इंटरनेट सेवेचा आनंद हा ४जी फोनवर घेता येणार नाही.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ चाचणीनंतर अखेर देशात ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला. देशातील तीन कंपन्यांनी सर्वाधिक स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. ५जी साठी एकूण १ लाख ५० हजार १७३ कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला आहे, ज्यामध्ये एकट्या रिलायन्स जियोने ८८ हजार, ०७८ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत, म्हणजेच जियोकडे ५० टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम आहे.
रिलायन्सने एकूण २४ हजार ७४० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले
- रिलायन्सने हे देखील निदर्शनास आणले आहे की, जियोची ५जी सेवा १५ ऑगस्ट रोजी लॉंच केली जाऊ शकते.
- रिलायन्सने २४ हजार ७४० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
- भारती एअरटेलने १९८६७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे.
- त्याच वेळी, व्होडाफोन-आयडियाने ६२२८ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे.
- या सगळ्यामध्ये ५जी लाँच झाल्यानंतर ४जी फोन बंद होतील का, असा मोठा प्रश्न समोर येत आहे. पण असे होणार नाही.