मुक्तपीठ टीम
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला आहे. २०२२ मधील सर्वाधिक इनकम टॅक्स भरणारा म्हणून त्याला आयकर विभागाने ‘सन्मान पत्र’ जाहीर केले आहे. सुपरस्टार अक्षय आता सुपरटॅक्सर झाला आहे. अक्षय कुमारने गेल्या पाच वर्षांपासून ‘सर्वाधिक करदाता’ ही पदवी कायम ठेवली आहे.
‘सर्वाधिक करदाता’ म्हणून अक्षय कुमारला सन्मानपत्र मिळाले
- अक्षय कुमारचे मानधन सन्मानपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
- इन्स्टंट बॉलीवूड नावाच्या इंस्टाग्राम पेजद्वारे कर प्रमाणपत्राचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
- ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “अक्षय कुमारला आयकर विभागाकडून सन्मानाचे पत्र मिळाले आहे, २०२२ मध्ये पुन्हा सर्वाधिक करदाते म्हणून त्याची निवड झाली आहे.”
‘कॅनडा कुमार’ म्हटल्यावर अक्षयची प्रतिक्रिया
- कॉफी विथ करण सीझन ७ मध्ये करणने अक्षय कुमारला विचारले की, तुला सोशल मीडियावर ट्रोल का केलं जातं?
- अक्षयने म्हटले की, त्याने उघड केले की लोक त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वाबद्दल तीव्र टीका करतात. ते जास्तीत जास्त कॅनडाबद्दल लिहितात. त्याची त्याला पर्वा नाही.
- करण पुढे म्हणाला, ट्रोलर्स तुला कॅनडा कुमार म्हणून ट्रोल करतात, त्यावर तो म्हणाला, ‘होय कॅनडा कुमार. ठीक आहे, तुम्ही मला या नावाने बोलावू शकता.”