Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, समर्थकांची जेसीबीतून पुष्पवृष्टी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm eknath shinde nashik visit

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी नाशिकपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मध्यरात्री २ वाजता मुख्यमंत्री मालेगावमध्ये पोहोचले. यावेळी शिंदे समर्थकांसह यावेळी शिंदे समर्थक आमदार दादा भुसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचं जंगी स्वागत केलं. तसेच पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आलेल्या एकनाथ शिंदे यांचे रात्री ११ वाजता पाथर्डी फाटा येथे त्यांच्या समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पाथर्डी फाटा येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शिंदे म्हणाले की, राज्यात स्थापन झालेले युतीचे सरकार हे सर्वसामान्य कामगारांचे सरकार आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल : शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात शनिवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

जेसीबीतून फुलांचा वर्षाव

  • नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचेही नियोजन करण्यात येत असून, नाशिकची विकासकामे करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या दौऱ्याला थोडा विलंब झाला, मात्र सायंकाळी ८ वाजल्यापासूनच शिंदे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी पाथर्डी फाट्यावर गर्दी केली होती.
  • यावेळी समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी केली.
  • यावेळी हेमंत गोडसे, सुहास कांदे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आदी दिग्गज स्थानिक नेते शिंदे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
  • त्याचवेळी नाशिकमध्ये एकही शिवसैनिक शिंदे यांना पाठिंबा देणार नसल्याचा दावा उद्धव गटाकडून केला जात आहे.
    मात्र, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती मामा ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक व्यासपीठावर उपस्थित होते.

भाजपाच्या नेत्यांनीही स्वागत केले

  • मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांसह भाजपाचे काही पदाधिकारीही तेथे उपस्थित होते. या सर्वांचे शिंदे यांनी स्वागत केले.
  • यानंतर शिंदे मालेगावला रवाना झाले.
  • वाटेत मुंबई नाका तसेच द्वारका चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले.

Tags: Cm Eknath ShindeMaharashtranashikनाशिकमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

कर्नाटकातील भाजपा पदाधिकारी का देत आहेत राजीनामे? जाणून घ्या हत्या आणि राजकारणाचं रक्तचरित्रम…

Next Post

‘कोश्यारी हटाओ’ साठी राष्ट्रपती भवनावर धडक मारा!

Next Post
bghat koshyari

'कोश्यारी हटाओ' साठी राष्ट्रपती भवनावर धडक मारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!