मुक्तपीठ टीम
शहरी करिअरिस्ट महिलेला विचारलं तर ती सांगेल एकवेळ नवरा नसेल चालेल, पण घरातील मोलकरीण ताई जाता कामा नये, असं विनोदानं सांगितलं जातं. त्यातून करिअरिस्ट महिलांसाठी मोलकरीण ताईंच महत्व दिसतं. हेच लक्षात घेऊन शाओमीनं घर स्वच्छ करणारा नवा स्मार्ट रोबोट लाँच केला आहे. त्या रोबोला खरं तर महिलांची मैत्रीण स्मार्ट रोबोबाई म्हणणंच योग्य ठरेल.
शाओमी आपले नवनवीन उपक्रमांवर काम करण्यास जबरदस्त तयारी सुरू केली आहे. शाओमी लवकरच ईव्ही लॉंच करणार आहे. आता घर स्वच्छ करणारे रोबोट लॉंच करण्याची घोषणा केली आहे. शाओमीने जागतिक स्तरावर आपले नवीन स्मार्ट उपकरण शाओमी रोबोट व्हॅक्यूम एस१०टी लॉंच करणार असल्याचे सांगितले आहे.
शाओमीचा हा पहिला स्मार्ट रोबोट क्लीनर असणार आहे. हा सर्वप्रथम चिनी बाजारात लाँच करण्यात आले. आता हा शाओमी रोबोट व्हॅक्यूम एस१०टी हाय सॅक्सन पॉवर आणि नवीन अँटी टँगल फिचरसह ऑफर केला जाईल. शाओमीने अजून त्याची किंमत जाहीर केलेली नाही. त्याच्या चीनी आवृत्तीची किंमत सुमारे २६ हजार रुपये आहे.
शाओमी रोबोट व्हॅक्यूम एस१०टी फिचर्स
- शाओमीचा पहिला रोबो क्लीनर ज्यामध्ये अँटी-टॅंगल क्षमता आहे.
- शाओमी रोबोट व्हॅक्यूम एस१०टी हा शाओमीचा पहिला रोबोट क्लीनर आहे, जो अँटी-टॅंगल क्षमतेसह येतो.
- या रोबोटला एक विशेष रोलर ब्रश मिळतो, जो बिल्ट-इन टूथ ब्लेडसह येतो.
- या फीचरच्या मदतीने हा रोबोट साफसफाई आणि पुसण्यासारख्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो.
- या रोबोटला 8,000 पीएपर्यंत व्हॅक्यूम फॅन ब्लोअर मिळतो, जो अगदी ११ मिमी स्टीलचे गोळे देखील उचलू शकतो.
- त्याची पाण्याची टाकी आणि डस्टबिन ४५० एमएस आणि २५० एमएल क्षमतेसह येतात.
- याला क्विक रिलीझ डस्टचे फिचर देखील मिळते.
- शाओमीच्या या रोबोटला नवीन पिढीचे एलडीएस लेसर रडार नेव्हिगेशन मिळते, जे घराचे व्हर्च्युअल नकाशे आणि व्हर्च्युअल झोन तयार करू शकते.
शाओमी रोबोट व्हॅक्यूम एस१०टी बॅटरी
- हा क्लिनर रोबोट ५ हजार २०० एमएएच बॅटरी पॅक करतो जो एका चार्जमध्ये घरातील १८० चौरस मीटरपर्यंत साफ करू शकतो.
- रोबोट स्मार्ट चार्जिंग फंक्शनसह देखील येतो ज्यामुळे तो डिस्चार्ज झाल्यावर पॉवर मोडशी कनेक्ट करून चार्ज करू शकतो.