मुक्तपीठ टीम
देशातील सर्वच विमानतळांना रात्रीही विमानं उतरवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण सतत प्रयत्न करत आहे. देशातील अशा सुविधा उभारण्यात येणाऱ्या २५ विमानतळांपैकी २ विमानतळ महाराष्ट्रात आहेत. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरण कोल्हापूर विमानतळांवर तशा सुविधा उभारत आहे.
डीजीसीए अर्थात नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने १० जून २०२२ रोजी विमानतळाचे परिक्षण केले आहे. या परिक्षणादरम्यान डीजीसीएने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार नियम पालनाबाबत प्राधिकरणाने या आधीच कार्यवाही सुरु केली आहे.