रोहिणी ठोंबरे
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. ठाणे शहरात त्यांच्या यात्रेचं धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिवसैनिकांसह उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी भिवंडीत आयोजित केलेल्या सभेत रोखठोक भाषण केलं. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. तरुणांनी “अलिबाबा आणि चाळीस चोर” घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे त्यावर मिश्किलपणे हसत म्हणाले, ही नावं मी नाही ठेवली. नाहीतर उद्या बातमी येईल. पण फुटलेल्या आमदारांनी ही जनभावना ओळखावी.
आदित्य ठाकरेंचं भाषण जसं आहे तसं…
हेच खरं शिवसेनेचं प्रेम आहे आणि ते मला पुन्हा एकदा जाणवत आहे. गेल्या एक महिन्यापासून २० जूनपासून ते काल २० जुलैपर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे एक वेगळं दुख:दायक वातावरण होते आणि हे स्वत:चं दुख: विसरूण जायला मी हा शिवसंवाद दौरा घेतलेला आहे. आपल्याशी भेटायला आपल्याकडून प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला. कारण जे काही चित्र मला दिसत होतं ते क्लेशता आहे अतिसय दुख:दायक होते. तुम्ही विचार करा आपण जवळून पाहिलेल्या शिवसैनिकांना मतदार म्हणून पाहिलेलं आहे. ज्यांना ज्यांना आपण स्वत:हून ओळखलं पुढे आणलं, त्यांची ओळख दिली तिकीटं दिली, मंत्रीपद दिले जे-जे आपण करू शकलो ते करून दिले. ते केल्यानंतर ते आपल्याला धोका देऊन सोडून गेले, आपल्याशी गद्दारी करून गेले हे तुम्हाला तरी पटणारं आहे का?
जे हक्कानं घरी यायचे, त्यांनी खंजिर का खुपसला?
येथे तरूण आहेत, आज तुम्ही हे राजकारण पाहत आहात हे तुम्हाला पटतं का? ही लोकशाही पटते का?
आज जेव्हा मी ठाण्यात येत होतो तिथे केदार दिघे माझं स्वागत करण्यासाठी उभे होते. अनेक ठाण्यातील तरूण मंडळी तेथे होती. मी लहानपणापासून ज्यांचे चेहरे एक परिवार म्हणून पाहत आहे, कधीही घरी यायचे. हक्काने बसायचे. जे काही आहे, ते हक्काने मागायचे आणि हे सर्व होत असताना, नेमकं घडलं काय बिघडलं काय? यांना आपल्या पाठीत खंजीर खुपसावासा का वाटला?
ज्यांना दिलं त्यांनी गद्दारी केली, ज्यांच्यावर अन्याय, ते निष्ठावान राहिले!
आपली शिवसेना हललेली नाही, हलले आहेत ते ज्यांना अपचन झालं आहे. खाऊन खाऊन. ते आपले शिवसैनिक नाही. तुमच्यात हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोर जा. आमदारांनी फक्त महाराष्ट्राशीच नाही तर माणुसकीशी गद्दारी केली आहे. आमच्याकडून ज्यांच्यावर अन्याय झाला ते निष्ठेने आमच्यासोबत आहेत. त्यामुळं चांगल्या लोकांना राजकारणात स्थान आहे.
बंड करायचं होतं तर महाराष्ट्रातच राहायचं!
अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची काम करत आलो. २४ तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आली. आम्ही २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण केले. त्यांच्यावर अंध विश्वास ठेवला म्हणून ते गेले. मात्र, शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार आहे. जे शिवसेना सोडून गेले, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते म्हणतायेत की आम्ही उठाव केला बंड केल. पण त्यांनी केलेलं बंड नव्हते, तर ती गद्दारी आहे. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागला आहे. बंड आणि उठाव करायला ताकत लागते. बंड करायचे असते तर हे गुवाहाटीला पळून गेले नसते. बंड करायचे असते तर ते महाराष्ट्रात राहिले असते, पळून गेले नसते.
बंडखोरांच्या धमक्यांना कुणी घाबरणार नाही!
सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात पूर आलं आहे. लोक त्रस्त आहेत. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. अशा काळात दोन लोकांचे मंत्रिमंडळ आहे. त्यामुळं हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार आहे. हे दिल्लीत बसले आहेत. महाराष्ट्रातील लोक त्रस्त आहेत. काही लोक युवासेनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर दबाब आणत आहेत पण त्यांच्या धमकीला कोणी घाबरणार नाही.