Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेसारखं हायजॅकिंग टाळण्यासाठीच राष्ट्रवादीची सावधगिरी? राष्ट्रीय विभाग, समित्या बरखास्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यामागे शिवसेनेतील बंडखोरीनंतरचा पक्ष हायजॅकिंगच्या होत असलेला प्रयत्न असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी त्या पत्रामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि समित्या बरखास्त केल्याची माहिती दिली आहे.

हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचं कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतरचे परिणाम हे कारण असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात. भाजपाच्या पाठबळावर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची सरकारमधील सत्ता हिसकावून घेतल्यानंतर आता ते पक्षाची सत्ताही हिसकावत त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी भाजपाच्या मदतीनं आधी विधानसभा आणि नंतर संसदेतही आपल्या गटाला अधिकृत पक्ष अशी मान्यता मिळवली. आता निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून ते मुख्य पक्षही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेला लागलेली जबर ठेच राष्ट्रवादी काँग्रेसने वेळीच सावधगिरी बाळगण्याची शहाणपणाची भूमिका घेतली असावी.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि समित्या बरखास्त!

  • सध्या सोशल मीडियावर प्रफुल्ल पटेल यांच्या सहीचे पत्र व्हायरल होत आहे. त्यात पक्षाचे सर्व विभाग आणि समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
  • पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समितीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
  • त्यानंतर प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय.
  • त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी सांगितलं.
  • विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

With the approval of our National President Hon’ble Shri Sharad Pawar Saheb, all the National level Departments and Cells of @NCPspeaks excluding Nationalist Women’s Congress, Nationalist Youth Congress and Nationalist Students Congress stand dissolved with immediate effect.

— Praful Patel (@praful_patel) July 20, 2022


Tags: BJPEknath Shinde GroupNCPPrafull Patelsharad pawarShivsenaएकनाथ शिंदे गटप्रफुल्ल पटेलभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेना
Previous Post

नदीपात्रातील गाळ काढा, पुराचा धोका टाळा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्या – ॲड. राहुल नार्वेकर

Next Post
Mhada Buildings In Colaba

कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्या - ॲड. राहुल नार्वेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!