मुक्तपीठ टीम
नुकताच सादर झालेल्या फोर्ब्सच्या रिअल टाइमच्या अहवालानुसार भारतातील उद्योगपती गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत. गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना देखील मागे टाकले आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ११३ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १०३ अब्ज डॉलर्स आहे.
बिल गेट्सला मागे टाकून अदानी चौथ्या क्रमांकावर!!
- फोर्ब्सच्या या अहवालामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत तर बिल गेट्स या यादीत पाचव्या स्थानावर आहेत.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ८७.१ अब्ज डॉलर आहे.
- आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेतील अंतर खूप वाढले आहे.
- टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क या यादीत २२३ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
- फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट १४५ अब्ज डॉलरसह दुसऱ्या आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस १३९ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
- लॅरी एलिसन ९७.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे.
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग २० व्या क्रमांकावर!!!
- दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट ९६.९अब्ज संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत.
- लॅरी पेज ९६.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या क्रमांकावर आहे, तर सेर्गे ब्रिन ९३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे.
- फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग २० व्या क्रमांकावर आहे. झुकरबर्गची एकूण संपत्ती ५९.३ अब्ज डॉलरवर आली आहे.