मुक्तपीठ टीम
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुढील महिन्यात वाढणार आहे असे मिळालेल्या माहितीतून दिसत आहे. महागाई भत्त्याबाबत येणाऱ्या अपडेटनुसार, केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवेल अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा पगार आपोआप वाढेल.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे महागाईचा आकडा. एआयसीपी निर्देशांक म्हणजेच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवला जातो. भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल.
महागाई भत्त्यात वाढीची घोषणा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता
- केंद्र सरकार पुढील कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
- आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ऑगस्टमध्ये होणार आहे.
- ऑगस्टमध्ये महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास त्याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याची थकबाकीही येईल.
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो. ऑगस्टमध्ये त्याची घोषणा होऊ शकते.
- कर्मचाऱ्यांना आता ३८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या त्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे.
- ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते.
सरकारने महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली
जर महागाई भत्ता वाढवला तर तो १ जुलै २०२२ पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टची थकबाकीही मिळणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. 4 टक्के वाढीनंतर त्यांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळेल. या आधारावर, जर १८ हजार रुपये पगार असलेल्यांना महागाई भत्त्यात ८ हजार ६४० रुपये वार्षिक लाभ मिळेल.