Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुलं की करिअर? एकच निवडण्यासाठी आईवर सक्ती शक्य नाही!

 मुंबई उच्च न्यायालयाचा करिअरिस्ट महिलांना दिलासा

July 14, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
mumbai court

मुक्तपीठ टीम

मुंबई उच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निकालात असा आदेश दिला आहे की, कोणत्याही आईला करिअर आणि मूल यापैकी निवडण्याची सक्ती करता येणार नाही. करिअर, मूल किंवा हे दोन्ही निवडण्याचा निर्णय हा तिच्यावर अवलंबून असेल. यासोबतच संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाने करिअरसाठी महिलेला मुलाला तिच्यासोबत परदेशात नेण्याची परवानगी दिली आहे.

हे प्रकरण पुण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या महिलेशी संबंधित आहे. कंपनीने महिलेला पोलंडमध्ये वरिष्ठ पदाची ऑफर दिली. यानंतर पतीने आपल्या लहान मुलीला परदेशात सोबत नेण्यास आक्षेप घेतला. यानंतर महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकेत महिलेने आपल्या नऊ वर्षांच्या मुलीसह पोलंडला जाण्याची परवानगी मागितली होती. महिलेच्या पतीने या याचिकेला विरोध केला होता आणि दावा केला होता की, जर मुलीला त्याच्यापासून दूर नेले गेले तर तो तिला पुन्हा पाहू शकणार नाही. महिलेचा पोलंडमध्ये स्थायिक होण्याचा एकमेव हेतू पिता-मुलीतील बंध तोडणे हाच असल्याचा आरोप पतीने केला आहे.

उच्च न्यायालयाने आदेश देत म्हटलं आहे की, मुलीला वडिलांना भेटण्यासाठी थांबवले जाणार नाही, हे स्पष्ट केले. सुट्ट्यांमध्ये महिलेला तिच्या मुलीसोबत भारतात येण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून वडील आपल्या मुलीला भेटू शकतील. पतीने उच्च न्यायालयात असेही सांगितले की तो आणि त्याचे कुटुंब भारतात मुलीची काळजी घेतील, परंतु हे नाकारण्यात आले.


Tags: Consolation to Careerist WomenLawmuktpeethmumbai high courtकरिअरिस्ट महिलांना दिलासाकायदा पोलीसघडलं-बिघडलंमुक्तपीठमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE पेट्रोल-डिझेलवरील कर कमी! शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय

Next Post

Dolo-650चा खप वाढवण्यासाठी डॉक्टरांना हजार कोटींचा बुस्टर डोस!

Next Post
Income tax raid on pharmaceutical company

Dolo-650चा खप वाढवण्यासाठी डॉक्टरांना हजार कोटींचा बुस्टर डोस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!