Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रपती निवडणूक २०२२ – निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक

July 14, 2022
in सरकारी बातम्या
0
निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक 2

मुक्तपीठ टीम

राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवडणुकीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

विधानभवन येथे, राष्ट्रपती निवडणुक २०२२ पूर्वतयारी बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. यावेळी विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मिलिंद भारंबे, शासन मुद्रण व लेखन सामुग्री संचालनालयाचे संचालक रूपेंद्र मोरे, विद्युत कार्यकारी अभियंता सुनीता रावते, वाहतूक पोलीस उपायुक्त महेश पाटील, विधानभवन सुरक्षा व्यवस्थाप्रमुख अर्जुन शिवकुमार, गृह विभागाचे उपसचिव संजय खेडकर, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, मुंबईचे विमानतळ सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक, नागरी विमान वाहतूक महानिदेशालयाचे प्रादेशिक उपायुक्त अशोक सातवसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अवर सचिव सुभाष नलावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता रेश्मा चव्हाण यावेळी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीकरिता दिनांक १८ जुलै,२०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वा.या कालावधीत विधान भवन, मुंबई येथे मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी आवश्यक सुरक्षाव्यवस्था गृह विभागाने द्यावी. राष्ट्रपती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटी व इतर साहित्य वाहनाने विधान भवन ते मुंबई विमानतळ (टर्मिनल-२) येथे नेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनासाठी विधान भवन, मुंबई ते मुंबई विमानतळ  असा “स्वतंत्र मार्ग” राखीव ठेवावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.आरोग्य विभागाने या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक यांची नेमणूक  करावी. सुरक्षा अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण करणारे प्रतिनिधी यांना विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश देण्याबाबत संबंधितांना विशेष प्रवेशपत्र  देखील देण्यात यावेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.

विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत म्हणाले, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबईने राष्ट्रपती निवडणुकीकरीता अधिकारी व मतपेटी यांची सुरक्षा विषयक तपासणी न होता थेट विमानात प्रवेश मिळण्याबाबत विमानतळ येथील नियुक्त अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबईने भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने मतदान कक्ष (आकार २१ x २१ x २१) तयार  करावा, मतपेटीस लावावयाचे स्टीकर्स बनविणे, मतदारांकरिता सूचना देणारे फ्लेक्स बनविण्यात यावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. अग्न‍िशमन विभागाने अग्निप्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ठिकाणची व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत करण्यात आल्या.

राष्ट्रपती निवडणूक 2022 राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त

भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक १८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाकरिता निवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी श्रीमती दीपाली मसीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानभवन, मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात श्रीमती मसीरकर ह्या दिनांक १७ जुलै रोजी दुपारनंतर मुंबईत येत असून त्या निवडणूक तयारीच्या कामकाजाची पाहणी करतील.

या निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने आवश्यक सामग्री जसे मतपेटी, मतपत्रिका, पेन आदी साहित्य दिनांक १२ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई येथे पाठविले आहे. हे सर्व साहित्य विधानभवनातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.


Tags: high level govt committeeMaharashtra MumbaiPresidential Electionउच्चस्तरीय समिती बैठकमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रपती निवडणूक २०२२
Previous Post

श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती, तीच स्थिती आज भारताची! – अतुल लोंढे

Next Post

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Eknath Shinde

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!