मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २५७५ नवीन रुग्णांचे निदान .
- आज ३२१० रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७८,४५,३०० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १०करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२४,८१,८०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,१०,२२३(०९.७१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १६९२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील साथरोग परिस्थिती :-
सध्या राज्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर साथ रोग सर्वेक्षण अधिक जोमाने करण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यात कॉलरा उद्रेक :-
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात दिनांक ७ जुलै २०२२ पासून कॉलरा उद्रेक सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये तर अमरावती तालुक्यातील नया अकोला या गावांमध्ये सध्या कॉलरा उद्रेक सुरू आहे.आतापर्यंत या उद्रेकांमध्ये १८१ रुग्ण आढळले असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन स्त्रिया आणि तीन पुरुषांचा समावेश आहे यातील तीन रुग्ण हे २४ ते ४० वर्ष वयोगटातील तर दोघे ७० वर्षांवरील आहेत. उद्रेक बाधित गावात वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत असून पाणी गुणवत्ता सनियंत्रण, रुग्ण सर्वेक्षण, उपचारासाठी आवश्यक व्यवस्था, लोक शिक्षण याद्वारे उद्रेक नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
उद्रेकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी राज्यस्तरीय पथक अमरावती येथे पोहोचले असून अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांनी या उद्रेकाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांना उद्रेक नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत.
पालघर येथे राज्यातील दुसरा झिका रुग्ण :-
झाई ता.तलासरी जिल्हा पालघर येथील आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका आजाराची लागण झाल्याचे एन आय व्ही पुणे यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.यापूर्वी जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता.या अनुषंगाने पालघर येथे सर्वेक्षण,कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,१०,२२३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ३८३
- ठाणे २४
- ठाणे मनपा ५८
- नवी मुंबई मनपा ७८
- कल्याण डोंबवली मनपा २३
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १४
- पालघर ७
- वसईविरार मनपा २२
- रायगड ६३
- पनवेल मनपा ३५
- ठाणे मंडळ एकूण ७१२
- नाशिक २१
- नाशिक मनपा ५८
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर २९
- अहमदनगर मनपा ६
- धुळे ३
- धुळे मनपा ४
- जळगाव १३
- जळगाव मनपा ९
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण १४६
- पुणे १७४
- पुणे मनपा ५७५
- पिंपरी चिंचवड मनपा २२९
- सोलापूर २९
- सोलापूर मनपा १८
- सातारा ४९
- पुणे मंडळ एकूण १०७४
- कोल्हापूर ९
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली १३
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१
- सिंधुदुर्ग ८
- रत्नागिरी ३४
- कोल्हापूर मंडळ एकूण ९०
- औरंगाबाद ७
- औरंगाबाद मनपा ४६
- जालना ४८
- हिंगोली ९
- परभणी ०
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ११२
- लातूर २४
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद १९
- बीड ४
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ५३
- अकोला १३
- अकोला मनपा १७
- अमरावती १
- अमरावती मनपा २०
- यवतमाळ २२
- बुलढाणा २८
- वाशिम ३७
- अकोला मंडळ एकूण १३८
- नागपूर ६५
- नागपूर मनपा १३३
- वर्धा ६
- भंडारा ३३
- गोंदिया ५
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ८
- नागपूर एकूण २५०
एकूण २५७५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या बुधवार, १३ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.