भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही एकूण ३६८ जागांची असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
पद आणि जागा
या भरतीसाठी पदवीधर मॅनेजर (फायर सर्विस) पदासाठी ११ जागा, मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी २ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) पदासाठी २६४ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (एयरपोर्ट ऑपरेशन) पदासाठी ८३ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल) पदासाठी ८ जागा अशा एकूण 368 जागांसाठी भरती आहे. तसेच ही भरती संपूर्ण भारतासाठी असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
पद क्र.१ साठी ६०% गुणांसह बी.ई/बी.टेक (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) ५ वर्षांचा अनुभव गरजेचा
पद क्र.२ साठी ६०% गुणांसह बी.ई/बी.टेक (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र.३ साठी ६०% गुणांसह बी.एससी (भौतिकशास्त्र आणि गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी आवश्यक
पद क्र.४ साठी ६०% गुणांसह बी.एससी+एमबीए किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी गरजेची
पद क्र.५ साठी ६०% गुणांसह बी.ई/बी.टेक (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
वयोमर्यादा
सदर पदासाठी वयाची अट ३० नोव्हेंबर २०२० रोजी [एससी/एसटी: ५ वर्षे सूट, ओबीसी: ३ वर्षे सूट]
पद क्र.१ आणि २ साठी ३२ वर्षांपर्यंत वयमर्यादा.
पद क्र. ३ ते ५ साठी २७ वर्षांपर्यंत वयोमर्यादा.
शुल्क
जनरल/ ओबीसीसाठी १,००० रूपये तर एससी/एसटी/महिलासाठी १७० रूपये शुल्क आकारण्यात आले आहेत.
ओनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२१ असणार आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहितीसाठी एएआयच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero या लिकवर क्लिक करून वाचावी.