मुक्तपीठ टीम
देशाच्या नावावर नितीन गडकरी यांच्या खात्यामुळे आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा महाविक्रम घडलाय तोही आपल्या महाराष्ट्रात. सिंगल कॉलम पिअरवर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम केले आहे. ३ किलोमीटर १४ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे. नागपुरात विश्वविक्रम केल्याबद्दल टीम महाराष्ट्र मेट्रो आणि टीम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या ट्विटच्या मालिकेत म्हटले आहे.
Another World Record! #GatiShakti #PragatiKaHighway pic.twitter.com/fecP6yK64L
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 10, 2022
या नव्या विक्रमी मार्गाच्या खालील पहिल्या स्तरावर जुना महामार्ग आहे. दुसऱ्या स्तरावर रस्ते वाहतूक उड्डाणपूल आहे आणि तिसऱ्या स्तरावर मेट्रो रेल्वे मार्ग आहे.
Another World Record in the Bag!
Heartiest Congratulations to Team Maha Metro & Team NHAI on achieving the world record in Nagpur by:
-Constructing longest Double Decker Viaduct (3.14 KM) with Highway Flyover & Metro Rail Supported on single column piers. @MetroRailNagpur pic.twitter.com/0kZhwtiiva— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 10, 2022
नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलावर जास्तीत जास्त मेट्रो ३ मेट्रो स्थानके बांधल्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. संपूर्ण देशासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.
हा दिवस साकारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे अतुलनीय काम करणारे अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे गडकरी यांनी आभार मानले आहेत. असा विकास म्हणजे नव भारतामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता आहे.