Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयात सत्तेचा ‘महा’संघर्ष: आज महत्वाचा दिवस! एकूण किती, कोणत्या आणि कोणाच्या याचिका?

July 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
maharashtra political crisis how many cases in supreme court?

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या सत्तांतरात शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या न्यायालयीन लढाईकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायलयात शिवसेना आणि शिंदे गटाने वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. तेथे एकूण किती, कोणती आणि कोणाच्या याचिका दाखल आहेत, याचा वेध…

सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या याचिका

अपात्रता प्रकरण

उपसभापतींच्या वतीने अपात्रतेच्या नोटिसा बजावलेल्या महाराष्ट्र शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने २७ जून रोजी दिलासा देत ४८ तासांत उत्तर देण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि इतर १५ आमदारांना दिलासा देताना १२ जुलैपर्यंत मुदत दिली होती.

बहुमत चाचणी प्रकरण

२९ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र विधानसभेत ३० जून रोजी बहुमत चाचणी निश्चित करण्यात आली होती. राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नोटीसही बजावली आहे.

१६ आमदारांना निलंबित करण्याची विनंती

सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै रोजी शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १५ बंडखोर आमदारांवर अपात्रतेचा गुन्हा दाखल होईपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात यावे, असा अर्ज दाखल केला आहे.

शिंदे गट प्रतोद मान्यतेलाही आव्हान…

एकनाथ शिंदे गटाने नामनिर्देशित केलेले प्रतोद भरत गोरावले यांच्या नियुक्तीला नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या त्या निर्णयाला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी ११ जुलैची तारीख निश्चित केली होती.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीलाही आव्हान

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीला उद्धव ठाकरे गटाने आव्हान देणारी याचिका शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी दाखल केली आहे. याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली होती.

याचिकेतील मुद्दे

  • सुभाष देसाई यांच्या वतीने शिंदे गट आणि भाजपा युतीला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणाऱ्या राज्यपालांच्या ३० जूनच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
  • एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आल्याने त्यांना आव्हान देण्यात आले आहे.
  • ३ आणि ४ जुलैच्या विधानसभेच्या कामकाजाच्या वैधतेलाही ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.
  • या दिवशी झालेल्या कामकाजातच विधानसभेच्या नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

Tags: Cm Eknath ShindeMahaashtraMaharashtra Political CrisesSupreme CourtUddhav Thackerayएकनाथ शिंदे गटमहाराष्ट्रशिवसेनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

डॉ. शंकरराव खरात: आंबेडकरी विचारांचा साहित्यसूर्य!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने फरार विजय मल्ल्याला सुनावली ४ महिन्यांची शिक्षा

Next Post
Vijay Mallya

सर्वोच्च न्यायालयाने फरार विजय मल्ल्याला सुनावली ४ महिन्यांची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!