Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

झुनझुनवालांच्या अकासा एअरलाइन्सची लवकरच भरारी, जोरदार तयारी!

July 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Akasa Airlines

मुक्तपीठ टीम

शेअर मार्केट म्हटलं की राकेश झुनझुनवालांचं नाव आठवणार नाही असं होत नाही. त्यांना भारतीय शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणूनही ओळखलं जातं. ते जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हा ५ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी प्रवास सुरू केला. आता त्यांनी १९ हजार कोटी रुपयांचं अवाढव्य साम्राज्य उभारलं आहे. आता त्यांनी विमान कंपनीच्या माध्यमातून आकाशात भरारी घेण्याचं ठरवलं आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या अकासा एअरलाइन्सची स्थापना केली. त्याचे नाव असे ठेवले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळालं आहे. याच महिन्यापासून विमान कंपनीची व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

अकासा एअरने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनच्या ऑपरेशनल तत्परतेच्या संदर्भात सर्व आवश्यकतांची पूर्तता केल्यानंतर त्यांना एओसी प्राप्त झाले आहे. डीजीसीएच्या देखरेखीखाली विमान कंपनीने अनेक चाचणी उड्डाणे यशस्वीपणे पार पाडली आहेत.

अकासा एअरविषयी सर्वकाही…

  • स्टॉक मार्केट दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरला २१ जून रोजी त्यांच्या पहिल्या बोईंग 737 MAX विमानाची डिलिव्हरी मिळाली होती.
  • अकासा एअरचे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले, “जुलै अखेरपर्यंत आमची व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याचा आमचा बेत आहे.“
  • ही पहिली एअरलाइन आहे जिची संपूर्ण एओसी प्रक्रिया सरकारच्या प्रगतीशील इजीसीए डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण झाली आहे.
  • अकासा एअरने सांगितले की दोन विमानांसह त्यांच्या व्यावसायिक ऑपरेशन्सना सुरूवात केली जाईल.
  • दर महिन्याला ते आपल्या ताफ्यात नवीन विमानांची भर घालणार आहेत.

आकासा एअरचे पहिले बोइंग ७३७ मॅक्स विमान २१ जून रोजी नवी दिल्लीत पोहोचले. विमान कंपनीने अधिकृतपणे १५ जून रोजी सिएटलमधील विमानाच्या चाव्या घेतल्या आणि आता ते देशात आले आहे. अकासाच्या आगमनाने विमान प्रवाशी वाहतूक क्षेत्रात आणखी स्पर्धा वाढण्याची अपेक्षा आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Akasa AirlinesGood news MorningRakesh Jhunjhunwalaअकासा एअरलाइन्सगुड न्यूज मॉर्निंगचांगली बातमीराकेश झुनझुनवाला
Previous Post

आहे ती परिस्थिती, मिळेल ती साधनं…जुगाड शोधांचे उद्योगपतीही फॅन!

Next Post

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत १३ हजार कोटींनी वाढ

Next Post
indian defense

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत १३ हजार कोटींनी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!