मुक्तपीठ टीम
आरे जंगलात सुरु असलेल्या आरे जंगल वाचवा आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तिथं पोहचले. त्यांनी तिथं माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, कांजुरमार्गला कारशेडचा पर्याय असतानाही पुन्हा आरे जंगलाचा बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही आरेची ८०० एकर जमीन आदिवासींचं हक्क राखत जंगल घोषित केली आहे. तरीही आरे जंगलातच कार शेडचा हट्ट धरणारे नवं सरकार हे मुंबईविरोधी सरकार आहे.
आरेसाठी आदित्य ठाकरे आक्रमक
- आमचं सरकार हे मुंबई, मुंबईकरांच्या बाजूने होते.
- आरेमधील ८०० एकर जमीन आम्ही जंगल घोषित केले होते.
- तसे करताना स्थानिक आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले.
- मुंबई मनपामार्फत रस्तेबांधणी करतानाही झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी प्रयत्न केले.
- कांजुरमार्गला आरे कारशेड नेल्यामुळे चार मेट्रो मार्गांची एकत्र कारशेड झाली असती.
- त्यामुळे आरे जंगल वाचत होतेच पण सरकारचे दहा हजार कोटी वाचत होते.
- आरे जंगलात कार शेड बांधताना ३३ किमी मार्गावर कुठेही स्टॅबिलायझिंग लाइन नाही, त्याचे काय?
- जिथं कारशेड बांधण्याचं ठरवलं तिथे आजही बिबटे, इतर वन्य प्राणी येतात.
- आता केवळ मुंबई सातत्यानं शिवसेनेला साथ देत असल्यानं मुंबईविरोधातील पहिला निर्णय या सरकारने घेतला.
- आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बजावलं, आता तेच मीही सांगतो.
- आता मी ऐकले जी कांजुरमार्गची जमीन आम्ही चार मार्गांच्या एकत्र कारशेडसाठी मागत होतो, तीच आता एका मार्गासाठी नवं सरकार मागत आहे. मग आमचं काय चुकीचं होतं?
Aarey is a unique forest within our city. Uddhav Thackeray ji declared 808 acres of Aarey as Forest and the car shed must move out. Our human greed and lack of compassion cannot be allowed to destroy biodiversity in our city. pic.twitter.com/YNbS0ryd8d
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 10, 2022