मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर एसएसआर’ या पदासाठी एकूण २ हजार ८०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, गणित, भौतिकशास्त्र गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान यापैकी किमान एका विषयासह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १७ वर्ष ५ महिने पूर्ण ते २३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शारीरिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक पात्रता उंची १५२.५ , छाती किमान ०५ सेमी फुगवून असली पाहिजे.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.