मुक्तपीठ टीम
रॉयल एनफिल्ड या भारतातील बाइक शौकिनांच्या ह्रदयाची धडकन असणाऱ्या ब्रँडला आता जगभर पसंती मिळत आहे. हा भारतातील सतत उत्पादन होत राहणारा सर्वात जुना जागतिक मोटरसायकल ब्रँड आहे. रॉयल एनफिल्डचा चेन्नईत उत्पादन प्रकल्प आहे. रॉयल एनफिल्डने मे महिन्यात ६१ हजारांहून अधिक मोटारसायकलींची किरकोळ विक्री केली आहे. जून महिन्यात त्यांची एकूण विक्री ४३ टक्क्यांनी वाढून ६१ हजार ४०७ युनिट्सवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत त्यांनी एकूण ४३ हजार ०४८ युनिट्सची विक्री केली होती.
रॉयल एनफिल्डच्या निर्यातीत ५४ टक्क्यांनी वाढ!
- रॉयल एनफिल्डची देशांतर्गत विक्री जून २०२१ मध्ये ३५,८१५ युनिट्सच्या तुलनेत जून २०२२मध्ये ५०,२६५ युनिट्स झाली आहे.
- देशांतर्गत विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे.
- रॉयल एनफिल्डची निर्यात ५४ टक्क्यांनी वाढून ११,१४२ युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ७,२३३ युनिट्सची होती.
क्लासिक ३५० भारतात सर्वात लोकप्रिय मॉडेल!
- क्लासिक ३५० हे भारतीय बाजारपेठेतील रॉयल एनफिल्डचे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे.
- त्याला २०२१ मध्ये नव्याने अपडेट देखील केले.
- मेटीओर ३५० मोटरसायकलकडून घेतलेल्या नवीन इंजिन आणि प्लॅटफॉर्मसह ती अपडेट केली.
- रॉयल एनफिल्डने मलेशियन मार्केटमध्ये क्लासिक ३५० आणि मेटीओर ३५० बाइक्स लाँच केल्या आहेत.