मुक्तपीठ टीम
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. मात्र, असे असताना मुंबईच्या हिंदमाता परिसरातील अनेक दशकांचा प्रश्न सुटला आहे. मुंबईला झोडणारा संततधार पाऊस पडूनही यावेळी तिथं पाणी साचलं नाही. दरवर्षी हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी तुंबत असल्याने मुंबई महापालिकेने या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधत भूमिगत टाक्या बांधल्या. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी खास लक्ष घालत सतत पाठपुरावा केला होता. या बातमीच्या शेवटी हिंदमाता परिसरातील पाणी साचण्याची समस्याच शब्दश: भूमिगत करणाऱ्या कामाच्या या आधीच्या बातम्या आणि व्हिडीओ नक्की वाचा, पाहा.
हिंदमाता परिसरात पाणी साचलं नाही!
- हिंदमाता परिसर खोलगट असल्यामुळे दर पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचत आलं.
- मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते व त्याचा लवकर निचरा होत नाही.
- अनेक दशकं न सुटलेली ही समस्या सोडवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी मनपामार्फत खास लक्ष घातले.
- या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या.
- पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
- हिंदमातामध्ये आज सकाळी पाणी न साचल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.
- मुंबई महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे.
- त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही.
- मुंबई महापालिकेनेदेखील भागातील व्हिडिओ ट्विट केला आहे.
हिंदमाता येथील वाहतूक सुरळीत सुरू आहे. #MyBMCUpdates pic.twitter.com/LFM8b5fEpQ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2022
हिंदमाता परिसराचा पावसाळी प्रश्न सोडवण्यासाठी भूमिगत टाक्यांचा फायदा!
- हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात केली आहे.
- त्यामुळे यंदा हिंदमाता परिसरात पाणी साचले नाही.
- हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी महापालिकेकडून सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
- या टाक्यांची क्षमता २.८७ कोटी लिटर इतकी आहे.
- पपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकीमुळे पाण्याचा निचरा लवकर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.
- यंदाच्या पावसात भूमिगत टाक्यांचा फायदा दिसून आला असल्याचे सिद्ध झालं आहे.
पाणी साचण्याच्या समस्येवर भूमिगत उपाय मांडताना काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
- जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच मोठ्या भरतीच्या कालावधीमध्ये या भूमिगत टाक्यांचा विशेष उपयोग होईल.
- या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी ३ तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील.
- मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
- या भूमिगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपिंग करुन त्या आच्छादित केल्या जातील.
- मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा भूमिगत टाक्या बांधण्यासाठी आणखी संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.
मुंबईत पाणी न साचल्याने मुख्यमंत्र्यांकडून पालिकेचे कौतुक!
- मुंबई महापालिकेच्या वॉर रूम मध्ये मी आलेलो आहे, एकदम चांगलं काम याठिकाणी केलं जातं आहे.
- प्रत्येक स्पॉट लाईव्ह दिसत आहेत.
- जवळपास २०० पेक्षा जास्त वॉटर लॉगिंगवाले होते, परंतु आता ते कमी झालेले आहेत.
- हिंदमाता इथे नेहमी पाणी भरतं तिथे यावर्षी पाणी साचलेले नाही.
- काही ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू होती
- त्यामुळे मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षात जे काम केले आहे, ते उत्कृष्ट रित्या केले आहे.
- योग्य नियोजन पालिकेने केलेले आहे .
हे ही वाचा:
डिलाईल पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी