मुक्तपीठ टीम
प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या रिले मशालीच्या सध्या प्रवास सुरु आहे. य़ा प्रवासादरम्यान ही मशाल महाराष्ट्रात आली आहे. या पवित्र ज्योतीचे स्वागत करण्यासाठी राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मशालीचा देशव्यापी प्रवास
या ऐतिहासिक मशाल रॅलीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त, या रिलेमध्ये एकूण ७५ शहरांचा समावेश आहे.
१९ जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल रिलेच्या ऐतिहासिक आरंभ दिनी, फिडे या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी माननीय पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात सुपूर्द केली.ऐतिहासिक शुभारंभानंतर , मशालीने राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ला, धरमशाला येथील एचपीसीए, अमृतसरमधील अटारी बॉर्डर, आग्रा येथील ताजमहाल आणि लखनौमधील विधानसभा, नागपुरातील झीरो माइल, मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासह ऐतिहासिक प्रतिष्ठा लाभलेल्या ठिकाणी प्रवास केला.
मशाल रिले स्पर्धा सिमुल बुद्धिबळाने सुरू होतात, जिथे ग्रँडमास्टर आणि मान्यवर बुद्धिबळपटू स्थानिक खेळाडूंसोबत खेळ खेळतात. कार्यक्रमानंतर, मशाल खुल्या जीपमधून विविध ठिकाणी फिरते.याशिवाय, एका शहरातून दुसर्या शहरामध्ये प्रवास करणार्या संवादात्मक बस सहलीसह,तरुण बुद्धिबळपटूंच्या समुदाय वैशिष्ट्य अधोरेखित करणारे प्रदेशानुसार बदलणारे सांस्कृतिक संचलनाचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.
प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच, भारत ४४ व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा केवळ आयोजकच नाही तर १९२७ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फिडे द्वारे स्थापित मशाल रिलेची सुरुवात करणारा पहिला देश आहे.आता दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.
स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्यामुले ४४ फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत २० खेळाडूंना स्पर्धेत उतरवणार आहे भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. भारत खुल्या आणि महिला गटात प्रत्येकी २ संघ उतरवण्यासाठी पात्र आहे. १८८ देशांमधून २००० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील ,बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. २८ जुलै ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत चेन्नई येथे ४४ वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रवास
नागपूर
नागपूर येथे पोहोचल्यानंतर ही बुद्धिबळ रिले मशाल शहरातील सुप्रसिद्ध झिरो माईल येथे नेण्यात आली. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आणि मशालीचे स्वागत करण्यासाठी खेळाडू, पारितोषिक विजेते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रँड मास्टर रौनक सधवानी, दिव्या देशमुख आणि संकल्प गुप्ता यांच्यासह विविध क्रीडा प्रकारांमध्ये नाव कमाविलेले राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्य बुद्धिबळ संघटना आणि नेहरू युवा केंद्राच्या सदस्यांसह जिल्हा पातळीवरील अधिकारी देखील या कार्यक्रमात भाग घेतला.
सर्व क्रीडा रसिकांसह या ऐतिहासिक मशालीला घेऊन निघालेली ही रॅली शहराच्या संविधान चौक, आकाशवाणी, महाराज बाग, विधी महाविद्यालय, रवी नगर चौक, वाडी टी केंद्र, हिंगणा जोड रस्ता किंवा जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, श्रद्धा पार्क, एमआयडीसी पोलीस स्थानक, छत्रपती स्क्वेअर आणि हिंगणा वाडी जोड रस्ता या भागांतून मार्गक्रमण केले.
सकाळी सुमारे आठ वाजता ती विमानतळाकडे गेली आणि तेथील मानवंदना स्वीकारून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराकडे रवाना झाली.
पुणे
पुण्यात, ही मशाल हडपसर येथील अमनोरा टाऊनशिपमध्ये दुपारी १२ च्या सुमारास पोहोचली. ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, महिला ग्रँड मास्टर इशा करवाडे, राज्य क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया, पीएमआरडीएआयुक्त डॉ.सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आणि राज्य बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला ग्रँड मास्टर इशा करवाडे हिच्याकडून बुद्धिबळ ऑलिंपियाड मशाल ग्रँड मास्टर अभिजित कुंटेकडे सोपविण्यात आली. कार्यक्रमानंतर ही मशाल रस्ते मार्गाने राज्याची राजधानी मुंबईला जाण्यासाठी मार्गस्थ झाली.
मुंबई
बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या पवित्र ज्योतीला घेऊन वाहनांचा ताफा मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून रवाना झाला. मुंबईत चेंबूर येथे ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसेंनी या ज्योतीचा स्वीकार केला. त्यानंतर ही मशाल, पूर्व मुक्त द्रुतगती मार्गावरून दक्षिण मुंबईत जमलेल्या क्रीडा प्रेमींकडे पोहचली. त्यानंतर, गेट-वे-ऑफ इंडिया च्या आयकॉनिक महत्त्वाच्या इमारतीजवळून आणि मरीन ड्राईव्ह तसेच ट्रायडंट हॉटेल येथून जात वानखेडे क्लब येथे पोहोचली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते आमीर खान यांच्यासह इतर मान्यवर या ऐतिहासिक मशालीचे स्वागत करण्यासाठी वानखेडे स्टेडीयम येथे उपस्थित होती. ग्रँड मास्टर अभिजित कुंटे तसेच सौम्या स्वामिनाथन हे देखील यावेळी उपस्थित होते.
देशव्यापी बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिले स्पर्धेचा एक भाग म्हणून, उद्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दूरसंचार विभागाच्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयातील खासगी नोंदणीकृत पथक पुणे शहरातील अमनोरा पार्क येथील अमनोरा क्लब आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.
ऐतिहासिक मशाल राज्यातून मुंबई येथून पुढील टप्प्यात प्रवेश करत गोव्याच्या प्रवासाला गेली.
गोवा
पणजी पहिल्यावहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे रविवारी गोव्यातील पोंडा शहरात स्वागत करण्यात आले.मशालीचा स्वागत समारंभ क्रांती मैदानावर झाला. क्रीडा मंत्री गोविंद गावडे , ग्रँड मास्टर अनुराग महामल यांच्या हस्ते मशाल स्वीकारण्यात येईल, त्यानंतर ती वॉकेथॉन रॅलीच्या माध्यमातून राजीव गांधी कला मंदिरात नेण्यात आली.