मुक्तपीठ टीम
मुंबईतील कुर्ला येथील परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री अचानक घडली. घटनेदरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे. यातील १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन यावेळी बचावकार्याची पाहणी केली.
Good Job #NDRF…
Visuals of #rescue operation in #Kurla, #Mumbai, where 4-storey #building collapsed.#buildingcollapse #rescueoperation pic.twitter.com/lel3Wpejxt
— Gurmeet Singh, IIS 🇮🇳 (@Gurmeet_Singhhh) June 28, 2022
ही घटना मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर येथील आहे. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. या घटनेदरम्यान २० ते २५ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.सध्या बचावकार्य सुरू असून आतापर्यंत बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.मदतीसाठी एनडीआरएफलाही घटनास्थळी बोलवण्यात आले आहे. उपकरणांसह एनडीआरएफचे जवान ढिगारा साफ आणि इमारत तोडत आहेत. पोलीस-प्रशासनाचे अधिकारी बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
घटनास्थळी आदित्य ठाकरे दाखल!
- घटनास्थळी पोहोचलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ही चार मजली इमारत अतिशय जीर्ण आहे.
- यामध्ये राहणाऱ्या लोकांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
- मुंबई मनपाने जेव्हा या इमारतीला नोटीस बजावली होती तेव्हा ती स्वेच्छेने रिकामी करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
- असे केले असते तर अपघाताच्या वेळी लोकांचे नुकसान झाले नसते.
- अशा मोडकळीस आलेल्या इमारतींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करू, जेणेकरून भविष्यात कोणाचेही नुकसान होणार नाही.