मुक्तपीठ टीम
मेटाच्या फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अश्या नामांकित प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने आपल्या यूजर्सचे अचूक वय शोधण्यासाठी काही नविन फिचर्स आणले आहेत. यासाठी, हा इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म दोन नवीन ऑप्शन ऑफर करत आहे, ज्यामध्ये व्हिडीओ अपलोड करण्याव्यतिरिक्त आयडीही अपलोड करता येतो. याचा अर्थ आता इंस्टाग्रामवर वयाच्या पडताळणीसाठी व्हिडिओ सेल्फी अपलोड करावा लागेल.
वय पडताळणी आवश्यक असणार
- इंस्टाग्रामने २०१९ मध्ये हे वय पडताळणीचे फिचर आणले आहे परंतु, हे फिचर फारसे प्रभावी नव्हते, कारण वय पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोकांना फक्त त्यांची जन्मतारीख प्रविष्ट करावी लागते. ही एक आवश्यक प्रक्रिया असली तरी त्यावर फारसा विश्वास ठेवता येत नव्हता.
- त्यानंतर इंस्टाग्रामने लोकांना त्यांचे अचूक वय तपासण्यासाठी त्यांचे अधिकृत ओळखपत्र जसे की ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आयडी कार्ड अपलोड करण्यास सांगितले.
२०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, १३ वर्षांखालील ४० टक्क्यांहून अधिक मुले इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहेत. तर प्लॅटफॉर्मचा दावा आहे की, त्यांच्या यूजर्सचे वय १३ वर्षांपेक्षा जास्त आहे. जर याची माहिती नसेल, तर जाणून घ्या की इंस्टाग्रामवर साइन अप करण्यासाठी यूजर्सचे वय १३ वर्षे असणे आवश्यक आहे. हा बदल फक्त त्या लोकांसाठी असेल जे त्यांचे वय बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा नवीन अकाउंट तयार करतात.
इंस्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीने त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांची जन्मतारीख प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आयडी अपलोड करणे, व्हिडिओ सेल्फी रेकॉर्ड करण्याचा पर्याय यासह तीन पर्यायांपैकी एक वापरून त्यांचे वय प्रविष्ट करणे आवश्यक आहे.