Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुलाबराव पाटील आसामात, ऑनलाइन काम महाराष्ट्रात!

June 23, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Har Ghar Jal

मुक्तपीठ टीम

कडवट निष्ठावान शिवसेना नेते म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणे, अनेकांसाठी धक्कादायक होतं. मात्र, ते आसामात गेले असतानाच त्यांचं महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून काम सुरुच ठेवलं आहे. सरकारी प्रसिद्धी विभागानं जारी केलेल्या बातमीनुसार गुलाबरावांनी आपल्या खात्याच्या मंत्रालयातील ऑनलाइन बैठकीत सहभागी घेऊन जल जीवन मिशनच्या ३७ हजार २२७ कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे.

जल जीवन मिशनच्या ३७ हजार २२७ कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरीसाठी बैठक

 मार्च, २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासनाकडून ५०-५० या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.            

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सन २०२४ पर्यंत जल जीवन मिशन कार्यक्रमासाठी एकूण रु. ३७,२२७.५० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत राज्यात ३७,९९३ नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून त्यानुसार ग्रामीण भागातील एकूण १,४६,०८,५३२ कुटूंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी या कार्यक्रमाचा रु.१५,६३३.५० कोटी खर्चाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण २७,३६,७७५ इतक्या कुटूंबांना नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित १५,१९,१७९ कुटूंबांना सन २०२३-२४ मध्ये नळ जोडण्या देण्यात येणार आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १,०४,१६,८६८ इतक्या नळजोडण्या देण्यात आल्या आहेत, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.            

या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जल जीवन मिशन अभियान संचालक व इतर अधिकारी मंत्रालयात उपस्थित होते.


Tags: Gulabrao PatilJal Jeevan MissionMaharashtraगुलाबराव पाटीलजल जीवन मिशनमहाराष्ट्र
Previous Post

संकटातील ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक: शेतकऱ्यांना लाभाचा तर युवावर्ग आणि आंदोलकांच्या गुन्हेमुक्तीचे निर्णय

Next Post

वाढत्या कोरोना संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
CM Uddhav Thackeray And Corona

वाढत्या कोरोना संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!