Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलिसांनी दिलं होतं बंडखोरीचं इनपूट! माहितीकडे दुर्लक्ष की दडवली?

June 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
maharashtra home ministry intelligence failure in shivsena revolt

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडाखोरीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. मात्र असं काही तरी चालू असल्याची माहिती राज्य गुप्तचर विभागाने (एसआयडी) गृहमंत्रालयाला दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा संबंधित घडामोडींशी संबंधित जाणकारांनी केला आहे.

SIDनं सरकारला दोन महिन्यांपूर्वीच दिलेली बंडखोरीची कल्पना!

  • शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली आहे.
  • अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती.
  • अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्‍यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते.

राज्य गुप्तचर विभाग काय करतो?

  • राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल तसेच राजकीय घडामोडी आणि हालचालींवरही लक्ष ठेवत आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे.
  • महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली.
  • राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते.
  • शिवसेनेतील बंडाची चाहूल लागत असल्याचं पोलिसांनी कळवलं होतं.

गृह मंत्रालयाचं अपयश?

परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारचं गृहखातं अयशस्वी ठरलं आहे. किंवा कदाचित मिळालेल्या माहितीची संवेदनशीलता सरकारमधील संबंधितांना लक्षात न आल्यामुळे दुर्लक्ष झालं की काहींनी जाणीवपूर्वक ती माहिती आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दडवली, हाही आता चर्चेचा मुद्दा झाला आहे.

शरद पवारांनी केली विचारणा

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विचारणा केली आहे.
  • राज्याच्या मंत्रिमंडळातील एवढे मंत्री, आमदार महाराष्ट्रातून रातोरात निघून गेले तरी कसं कळलं नाही, असा प्रश्न शरद पवार यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना केला आहे.

Tags: Eknath ShindeMaharashtraMVAsharad pawarShivsenaSIDएकनाथ शिंदेमहाराष्ट्रमहाविकास आघाडीराज्य गुप्तचर विभागशरद पवारशिवसेना
Previous Post

शिवसेना आमदार नितीन देशमुखांना सुरतमध्ये मारहाण, जबरदस्तीनं टोचले इंजेक्शन! वाचा त्यांच्याच शब्दात…

Next Post

#मुक्तपीठ #Live राहुल गांधींनी सांगितली ईडीची कहाणी…

Next Post
#मुक्तपीठ #Live   राहुल गांधींनी सांगितली ईडीची कहाणी…

#मुक्तपीठ #Live राहुल गांधींनी सांगितली ईडीची कहाणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!