मुक्तपीठ टीम
सोमवार रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बंडखोर नेते एखनाथ शिंदे यांच्यामुळे भूकंप आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावाही केला आहे. मात्र हे आमदार स्वत:च्या मर्जीने सूरतला गेलेत का असा प्रश्न निर्माण झाला होता कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सूरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. तसेच शिवसेना आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेलं, याचा पहिला प्रसंग समोर आला. परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी संजय राऊतांचा आरोप फेटाळून लावला आहे.
संजय राऊतांनी काय आरोप केले?
आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली.मुंबईतील गुंड तेथे आहेत. तसेच पुढे त्यांनी गुजरातच्या भूमीवर हिंसा ? असा प्रश्न विचारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे.
आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली.मुंबईतील गुंड तेथे
आहेत
गुजरातच्या भूमीवर हिंसा ? @AmitShah4BJP @CMOGuj— Sanjay Raut (@rautsanjay61) June 21, 2022
कैलास पाटील यांच्यासोबत घडलेला प्रसंग!
- विधान परिषद निवडणूक संपल्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला जेवायला बोलाविले आहे, असं सांगून आमदार कैलास पाटील यांना एका खासगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले.
- ठाण्यापासून सुमारे ४० किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे, हे कैलास पाटील यांच्या लक्षात आलं.
- मात्र जसंही आपली दिशाभूल केली गेलीय, असं त्यांना कळालं.
- त्याच क्षणी त्यांनी मला लघुशंकेला थांबायचं आहे, असं त्यांनी गाडीच्या ड्रायव्हराला सांगितलं.
- त्यानंतर ते गाडीतून उतरले.
- अंधाराचा फायदा घेऊन ते तिथून पसार झाले.
- जीव धोक्यात घालून कैलास पाटील यांनी संबंधित सर्वांनाच गुंगारा देत रात्रीच्या अंधारात गुजरात महाराष्ट्र बॉर्डर जवळीत एका अज्ञात ठिकाणाहून भर पावसात ४ किमी पायी आले.
- त्यानंतर मिळेल त्या गाडीने त्यांनी मुंबई गाठली.
- पायी चालत, तसेच त्यानंतर दुचाकीवर एका व्यक्तीकडून त्यांनी लिफ्ट घेतली.
- आणि नंतर ट्रकने दहिसरला पोहोचले.
- कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली.
- खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेतृत्वाला सांगितला.
एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी संजय राऊतांचा आरोप फेटाळून लावला!
- सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण, जबरदस्ती करण्यात आलेली नाही.
- आमदारांच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.
- आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत.
- आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे, असं ते म्हणाले.
- हे सर्व आमदार आहेत.
- त्यांना मारुन मुकटून कसं ठेवतील.
- आमदार छोटा माणूस नसतो की त्याला मारुन बसवू शकू.
- आम्ही आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं आहोतं.
- आमदार नितीन देशमुख यांची तब्येत व्यवस्थित आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.