Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी महिलांसाठी स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना! १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा!

June 18, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Mantralay

मुक्तपीठ टीम

इतर मागास प्रवर्गातील महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ‘महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना’ सुरू करण्‍यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची उत्पादने, प्रक्रिया मुल्य आधारीत उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या ५ लाख रुपयापर्यंतच्या आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या घटकातील अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (OMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. बचत गटात किमान ५० टक्के इतर मागास प्रवर्गातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात १० लाख रुपयांपर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करुन घेण्यास पात्र होईल, बँकेकडून मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल, या योजनेचे स्वरूप, अर्जदाराच्या पात्रतेच्या अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती दिनांक ०७ जून २०२२ च्या शासन निर्णयात देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राज्य व देशांतर्गत उच्च शिक्षणाकरिता ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ त्याचप्रमाणे परंपरागत व्यवसायात कार्यरत व इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवक-युवतींसाठी ‘कौशल्य विकास प्रशिक्षण योजना’ देखील अंमलात आणली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील अधिकाधिक पात्र महिलांनी ‘महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा’ योजनेचा लाभ घेवून स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावे व राज्याच्या आर्थिक विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.


Tags: good newsInterest ReturnmuktpeethOBC WomenOBCमहिलाSwayamsiddhi Interest Return Schemeचांगली बातमीमुक्तपीठव्याज परतावास्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
Previous Post

जालन्याच्या अंबड आयटीआयमध्ये सोलर टेक्निशियनसह ३ नवीन अभ्यासक्रम

Next Post

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात नोकरीची संधी

Next Post
becil

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!