मुक्तपीठ टीम
येत्या २० जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहेत. या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपाविरोधात एकच उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर भाजपाही बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या संपर्कात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठवरण्यासाठी शिवसेनेचा भाजपाशी संवाद होऊ शकतो.
भाजपासाठी शिवसेनेची दारे सदैव खुली आहेत, असं विधानही संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचाही संदर्भ आहे. मुंबईतील मोदींच्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती, त्यांचं भाषण, पंतप्रधान आणि त्यांची देहबोली यातून दोन पक्षांमधील टोकाचा तणाव काहीसा निवळलेला जाणवल्याचं, राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंब्यासाठी दारं किलकिली करून शिवसेना सकारात्मक संकेत देत असल्याचं मानलं जातं. याचा अर्थ लगेच राज्याच्या राजकारणातील सध्याची समीकरणे बदलणार, असं नसून दोन जुन्या मित्रांमधील कमालीची कटुता निवळण्याची सुरुवात होऊ शकते, असं असावं.
शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष!
- शिवसेना नेते संजय राऊत अयोध्येत आहेत.
- त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं.
- चर्चेची दारे कधीच शिवसेनेने बंद केली नाही.
- जेव्हा राष्ट्रीय विचार, मुद्दे असतात त्यावेळी शिवसेना नेहमीच सहकार्य करते.
- शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे.
- कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे हे कधीच दरवाजे बंद करून बसले नाहीत.
- राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी नेहमी दरवाजे उघडे ठेवले आहेत.
- तुमचा प्रश्न राजकीय आहे.
- पण राष्ट्रीय प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे कधीही खालच्या पातळीचं राजकारण करत नाहीत.
- आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व आणि दिशा मिळावी अशीच आहे.
- म्हणून राहुल गांधींची चौकशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे.
- हा राजकीय दबावाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणी पुढाकार घेऊ नये म्हणून अशा प्रकारची कारवाई सुरू आहे.
- २०२४ च्या निवडणुकीची ही तयारी सुरू आहे.
राजनाथ सिंह यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा!
- एकीकडे राष्ट्रपतीपदासाठी भाजपा उमेदवार ठरवत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
- दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधकांची बैठक आयोजित केली होती.
- या बैठकीला १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
- या बैठकीनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भाजपेतर पक्षांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
- राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली.