मुक्तपीठ टीम
फिल्म इंडस्ट्री बाहेरून जितकी चांगली दिसते तितकीच, आतून तिची दुर्दशाही आहे. अनेक सेलिब्रिटी या विश्वात हरवून जातात. या सगळ्यात असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे स्थान फार काळ टिकून राहत नाही. तर, असे काही स्टार्स असतात ज्यांना फ्लॉपमधून सुपरहिट व्हायचे असते आणि अशा परिस्थितीत ते ड्रग्जच्या आहारी जातात आणि स्वत:चे करिअर ते उद्ध्वस्त करतात. या यादीत संजय दत्त, फरदीन खान, हनी सिंग यांसारखे एकेकाळी सुप्रसिद्ध असणारे कलाकार आहेत. नुकतेच शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
बॉलिवूड स्टार्सना नशेचा बसलेला फटका
संजय दत्त
व्यसनामुळे करिअर उद्ध्वस्त झाले यात पहिले नाव संजय दत्तचे आहे. संजय दत्त वयाच्या १२ वर्षांपासून दारूच्या नशेत राहिला. त्याचे वडील सुनील दत्त यांनी त्याला व्यसनमुक्तीसाठी खूप मदत केली. मात्र, त्यानंतर काही काळानंतर त्याने व्यसन करणं सोडलं.
हनी सिंग
हनी सिंगला आज कोण ओळखत नाही? त्यांची गाणी मोठ्यांपासून लहान मुलांच्या ओठावर आहेत. हनी सिंगने बॉलिवूडला एकापेक्षा एक गाणी दिली आहेत. पण एक काळ असा होता की तो नशेच्या आहारी गेला होता. त्याने आपले करिअर पणाला लावले होते. मात्र, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो पुन्हा चित्रपट जगतात आला आहे.
कपिल शर्मा
कॉमेडियन कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. कपिलचे नाव आणि प्रसिद्धी दोन्ही आहे. खूप मेहनत घेऊन त्याने आपले करिअर बनवले आहे. पण एक काळ असा होता की कॉमेडी किंगला ड्रग्जचे व्यसन जडले होते. पार्ट्यांमध्ये तो अनेकदा मद्यधुंद अवस्थेत दिसत होता. अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल त्यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आता मात्र तो यातून बाहेर आला आहे.
फरदीन खान
अभिनेता फिरोज खानचा मुलगा फरदीन खान यालाही ड्रग्जचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्यांची कारकीर्दही उद्ध्वस्त झाली. फरदीनच्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला अटकही केली असून तो काही दिवस तुरुंगात होता. तो बऱ्याच दिवसांपासून चित्रपट विश्वाच्या बाहेर आहे. अलीकडेच तो आयफा पुरस्कार सोहळ्यात दिसला.
प्रतिक बब्बर
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रतीक मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसला, पण एक वेळ अशी आली की ड्रग्समुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले. मात्र, आता त्याने स्वत:ची काळजी घेतली आहे.