Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार विखे पाटील यांना उपरती, शिवसेनेसोबत राहणार ते तालुक्यापुरतंच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sujay Vikhe Patil's clarification on ShivSena issue

मुक्तपीठ टीम

पारनेर तालुक्यात असलेल्या शिवसैनिकांवर संकट आल्यास मी त्यांच्यासोबत राहिल, माझ्यावर देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली तरी चालेल, असे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले होते. या वक्तव्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या. यावरून सुजय विखे पाटील यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. मात्र त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, अशी भूमिका खासदार विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला…

  • पारनेर तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केले.
  • परंतु माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला.
  • जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच करण्याची भूमिका आपली कायम असून याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्यांचाच असणार आहे.
  • पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तूस्थिती आपण वरिष्ठांना देवून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार विखे पाटील यांना उपरती, शिवसेनेसोबत राहणार ते तालुक्यापुरतंच!

  • मी खासदार म्हणून निवडून येण्यात पन्नास टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे.
  • त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही.
  • मातोश्रीच्या विरोधात, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही.
  • माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
  • त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे, हे मी सांगत आहे.
  • माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले.
  • मला त्याची खंत वाटली नाही.
  • केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजपा आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील.
  • जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही.
  • यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल.
  • असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपाचा एकमेव खासदार आहे.
  • ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो.

Tags: BJPdevendra fadanvisParner DistrictPM Narendra modiShivsenaSujay vikhe patilदेवेंद्र फडणवीसपंतप्रधआन नरेंद्र मोदीपारनेर तालुकाभाजपाशिवसेनासुजय विखे पाटील
Previous Post

अहमदनगरच्या मिलिटरी रूग्णालयात कुक, वॉर्ड सहाय्यिका पदांच्या ६७ जागांवर संधी

Next Post

अंगणवाडी सेविकांचा वसा, ध्यास सुपोषित महाराष्ट्राचा!

Next Post
अंगणवाडी सेविकांचा वसा, ध्यास सुपोषित महाराष्ट्राचा!

अंगणवाडी सेविकांचा वसा, ध्यास सुपोषित महाराष्ट्राचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!