मुक्तपीठ टीम
अहमदनगरच्या मिलिटरी रूग्णालयात कुक या पदासाठी १० जागा, वॉर्ड सहाय्यिका या पदासाठी ५७ जागा अशा एकूण ६७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
- पद क्र.२- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रिसायडिंग ऑफिसर (BOO-III) मुख्यालय साउथर्न कमांड मिलिटरी रूग्णालय अहमदनगर
अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.