मुक्तपीठ टीम
मध्य प्रदेशातील उज्जैन लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल फिरोजिया सध्या चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आव्हान स्वीकारून फिरोजिया यांनी आपले वजन कमी केले. आता फिरोजिया यांनी दावा केला आहे की, त्यांनी १५ किलो वजन कमी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन परिसराच्या विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
फिरोझिया सकाळची सुरुवात घरातील छोट्या बागेत व्यायाम करतात आणि नंतर सायकल चालवतात. ते संतुलित आहार घेत आहेत. त्यांनी सांगितले की, “१५ किलो वजन कमी केल्यानंतर आता विकासकामांसाठी गडकरींकडे १५ हजार कोटी रुपयांची मागणी करण्याचा त्यांचा हक्क आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघाला विकासासाठी अधिकाधिक पैसे मिळावेत यासाठी आपले वजन कमी करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.”
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी २४ फेब्रुवारी रोजी उज्जैनला पोहोचले होते. विकासकामांच्या घोषणांदरम्यान त्यांनी आरोग्याबाबत सल्ला देत खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिले. हे मान्य करत खासदाराने ४ महिन्यात १५ किलो वजन कमी केले.
अनिल फिरोजिया सातत्याने नितीन गडकरींकडे या परिसराच्या विकासासाठी बजेटची मागणी करत होते. तेव्हा गडकरींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. त्यांनी आपले वजन कमी केले तर, प्रत्येक किलोग्रामच्या बदल्यात या भागाच्या विकासासाठी १००० हजार कोटींचे बजेट दिले जाईल. नितीन गडकरींचे आव्हान मिळाल्यानंतर खासदारांनी वजन कमी करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.
फेब्रुवारी महिन्यात फिरोजिया यांचे वजन १२५ किलो होते. नितीन गडकरी यांनी मंचावरून ही घोषणा केल्याचे खासदार फिरोजिया यांनी सांगितले की, “मी जेवढे किलो वजन कमी करेन तेवढेच मंत्रालयातून माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी हजार कोटींचा निधी मिळेल.” अशी घोषणा नितीन गडकरींनी मंचावरून केली होती, असे खासदार म्हणाले. गडकरींनी त्यांना फिट होण्यासाठी प्रेरित केल्याचे फिरोझिया यांनी सांगितले. मी सध्या फिटनेसचे नियम पाळत आहे.