मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात एक वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांना शेतकरी आणि लोकसवर्गणीतून गाड्या देण्यात येणार आहे. देशभर प्रसिद्ध असणारे शेतकरी नेते राजू शेट्टी आणि युवा नेते रविकांत तुपकर या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना गाड्या प्रदान केल्या जाणार आहेत. चळवळ टिकवण्यासाठी हा कृतज्ञता उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या शिरोळमध्ये राजू शेट्टींना गाडी प्रदान करणार!
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना गाडी प्रदान सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.
- येत्या १३ जून २०२२ रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
- कोल्हापुरातील शिरोळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.
- इंद्रजित देशमुख (माजी सनदी अधिकारी) यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (माजी अध्यक्ष, राज्य नाखूर संघ) हा सोहळा पार पडेल.
- या कार्यक्रमाला सतिशभैय्या काकडे (अध्यक्ष , शेतकरी कृती समिती), अनिल उर्फ सावकर मादनाईक (मा.सभापती, बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद कोल्हापूर)
- मा.प्रा . डॉ . जालंदर पाटील ( प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी पक्ष ) यांची प्रमुख उपस्थिती असेल.
रविकांत तुपकर यांना शेतकरी लाकवर्गणीतून चारचाकी!
- सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात गेली १८ वर्ष जिवाची पर्वा न करता निधड्या छातीने रविकांत तुपकर लढत आहेत.
- अत्यंत सामान्य कुटुंबातून ते आलेला हा तरुण नेता जवळपास गेल्या दोन दशकांपासून घरादारावर तुळशीपत्रं ठेऊन चळवळीला समर्पित झाल्याचे त्यांचे सहकारी अभिमानाने सांगतात.
- असं एक आंदोलन नाही जे रविकांत तुपकर यांनी केलं नाही, आणि असं महाराष्ट्रात एक गाव नाही, जिथे रविकांत तुपकर हे नाव नाही, असा त्यांच्या समर्थकांचा दावा असतो.
- शेतकऱ्यांसाठी मरेस्तोवर व्यवस्थेचा मार खाल्ला, पोलिसांचे वार झेलले, तुरुंगात गेले, एवढंच तडीपारही झाले; पण तरीही खचले नाही, झुकले नाही, पुन्हा पेटून उठले अन् युवा पिढीचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा झाले, असेही कौतुकाने सांगितले जाते.
- सोयाबीन कापूस प्रश्नांवर त्यांनी मोठा आंदोलन केले.
- त्यामुळे समाजाचे संवेदनशील घटक म्हणून रविकांत तुपकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांच्या चळवळीला राज्यभर अधिक गतिमान करण्यासाठी त्यांना शेतकरी लोकवर्गणीतून चारचाकी वाहन भेट देत आहेत.