प्रतिक कांबळे/ मुक्तपीठ
रयतेचे राजे, कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्त पवईत दिल्लीतील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि त्यांच्या सन्मानार्थ पवई हिरानंदानी हेरीटेज उद्यान येथे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेती विषयक धोरणावर असलेला दृष्टिकोन लक्षात घेता हे आंदोलन पवईतील युथ पावर संघटना, धडक कामगार युनियन आणि डी.वाय.एफ. आय या तीन संघटनांनी एकत्रित येऊन केले होते.
दिल्लीत कडाक्याच्या थंडीत आपला शेतकरी बांधव हक्काची लढाई लढत आहे. त्या लढाईला आपलाही कुठेतरी हातभार लागावा आणि महाराजांनी दिलेला कृषी प्रधान भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन पवईत करण्यात आले होते.
या आंदोलनात प्रत्येकांच्या हातात तिरंगा ध्वज आणि शेतकऱ्यांन विरूद्ध असलेला काळा कायदा रद्द करा असे फलक घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा समोर ठेवून हे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात पवईतील बऱ्याच संघटना एकत्रित येत सर्वांनी भारतीय म्हणून सहभाग घेतला होता. “देश की जनता भुकी है! किसान अभी भी दुखी है!”, “काळा कानुन रद्द करा”, “जय जवान जय किसान” अशाप्रकारे नारे देते या काळ्या कायद्याचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केलेले हे आंदोलनाचे आयोजन युथ पावर संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष विरेंद्र धिवार, धडक कामगार युनियन मुंबई सचिव प्रकाश निकम आणि डी.वाय.एफ.आय मुंबई सचिव महेंद्र उघडे यांनी केले होते.
सर्व सामान्य माणूस हा जे काही अन्नधान्य आपली भुक भागवण्यासाठी खात आहे ते या शेतकऱ्यांनमुळेच म्हणून त्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा सन्मान म्हणून पवईत शिवजयंती निमित्त आम्ही तिरंगा सन्मान रॅली चे आयोजन केले होते परंतु वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता सरकारी आदेश आणि नियमाचे काटेकोर पालन करीत आम्ही हेरीटेज उद्यान हिरानंदानी येथेच आमचे आंदोलन संपन्न केले असे आयोजकांनी आमच्याशी बोलताना सांगितले.