क्रीडा थोडक्यात: १) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत कसोटीत मास्टरक्लास दाखवणाऱ्या भारताचा फलंदाज हनुमा विहारीला आयपीएल लिलावात सलग दुसऱ्या वर्षी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. पण चांगली कामगिरी केली नसल्याने त्याला संघाकडून मोकळे करण्यात आले होते. तर २०२० आणि २०२१ मध्ये त्याला कोणताही संघ मिळालेला नाही. विराहीने लिलावासाठी स्वत:ची बेस प्राइस १ कोटी निश्चित केले होती. २) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उभय संघांत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. ३) गतविजेता आणि अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. सर्बियाच्या जोकोव्हिचने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ४) श्रीलंकेच्या अनेक क्रिकेटपटू देश सोडण्याच्या विचारात आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे आणि ते अमेरिकेकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रीय संघात योग्य संधी मिळत नसल्यामुळे व पगार कपातीमुळे ते अमेरिकेत खेळण्याच्या विचारात आहे. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज उपुल थरंगा आणि दुशमंत चामेरा यांच्यासह १५ खेळाडूंची नावे आहेत.