मुक्तपीठ टीम
कोरोना रोखण्यासाठी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांनी कंबर कसली आहे. पाचही जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेनं काटेकोरपणे कोरोना नियमावलीचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. तराही काही ठिकाणी लोकांकडून सुरक्षा नियमावलीचे उल्लंघन होत आहे. त्या ठिकाणी कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश काढले आहेत.यामध्ये हॉल,लॉन्स, मंगल कार्यालय तसेच इतर अन्य ठिकाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करतांना उपस्थितांच्यामर्यादेचे बंधन घातले आहे. तसेच समारंभाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षिततेच्या नियमांचे काटकोर पालन करणे आवश्यक आहे. पोलीस, प्रशासकीय प्रमुखांनी केलेल्या कार्यवाईचा अहवाल तत्काळ आपत्कालीन कक्षास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना केअर सेंटरची तपासणी व आवश्यक साहित्याची स्थिती तपासणीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लग्न संमारभाच्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून येणार नाही याची दक्षता घेणे. तसेच शाळा, महाविद्यालय, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कोरोनाच्या नियमांचे पालन करता आहेत की नाही याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.
धूळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपये दंड,डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे.
तसेच खासगी डॉक्टरांकडून नियमितपणे घेणार आढावा घेण्यात यावा. गृह विलगीकरण, अलगीकरणातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार. बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची चाचणी करावी. विवाह सोहळ्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असून सर्व हॉटेल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच राहणार सुरू राहणार.दुकानात एकावेळी मिळणार पाच ग्राहकांनाच प्रवेश, प्रवासी वाहनांतील संख्येवर निर्बंध तसेच सार्वजनिक उद्याने पहाटे 5 सकाळी ते 9 पर्यंतच खुली राहणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका आदेशान्वये जाहिर केले आहे.
जळगांव जिल्ह्यात लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाई होणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. रुग्णसंख्या वाढल्यास शाळांबाबतही निर्णय घेण्यात येईल असेही राऊत यांनी सांगितले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात उपहार गृहे, हॉटेल, रेस्टाँरंट व तत्सम ठिकाणे इत्यादी ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील. खाजगी कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रे येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दकण्यात आले आहे. भाजी मार्केट, शॉपिंग कॉम्लेक्स, मॉल या ठिकाणी एकावेळी केवळ 5 ग्राहक उपस्थित राहतील. याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.