मुक्तपीठ टीम
उबेर कॅबने प्रवास करताना अनेक प्रवासी आपले सामान विसरतात. या वस्तूंमध्ये आधार कार्ड, ५ किलोचा डंबेल, महाविद्यालयीन प्रमाणपत्र आणि वाढदिवसाचा केक यांचाही समावेश आहे. ही माहिती उबर या अॅपवर आधारित कॅब सेवा कंपनीच्या अहवालातून मिळालेली आहे. अहवालानुसार, मुंबई हे भारतातील ‘सर्वाधिक विसराळू शहर’ आहे. गेल्या वर्षी, फोन, स्पीकर, हेडफोन, पर्स आणि बॅग्स भारतभरातील उबेर कॅबमध्ये मागे राहिलेल्या वस्तूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. इतर वस्तूंमध्ये किराणा सामान, पाण्याच्या बाटल्या आणि फोन चार्जर यांचा समावेश होता.
‘ही’ शहरंही विसराळूपणात टॉपर
- उबेरने जारी केलेल्या लॉस्ट अॅंड फाउंड इंडेक्स २०२२ मध्ये, नेहमीच्या गोष्टी विसरण्याव्यतिरिक्त, लोक बासरी, आधार कार्ड, डंबेल, क्रिकेट बॅट, स्पाइक गार्ड आणि कॉलेजचे प्रमाणपत्र यांसारख्या गोष्टी देखील विसरतात.
- उबेरने एका निवेदनात म्हटले आहे की, मुंबईने सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वात विसराळू शहराचा किताब पटकावला आहे.
- त्याचवेळी दिल्ली-एनसीआर आणि लखनौ ही शहरे विसरण्यात आघाडीवर आहेत.
बहुतेक लोक सामान दुपारच्या वेळेस विसरतात
- बहुतेक भारतीय त्यांचे सामान दुपारी १ ते ३ च्या दरम्यान कॅबमध्ये विसरतात.
- नितीश भूषण, सेंट्रल ऑपरेशन्स, उबेर इंडियाचे संचालक म्हणाले, “आम्ही समजतो की एखादी वस्तू गमावणे चिंतेची गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही उबेरमध्ये प्रवास करत असताना एखादी वस्तू हरवली तर तुमच्याकडे ती मिळवण्याचा पर्याय नेहमीच असतो.
- तसेच, ट्रिप संपल्यानंतर मागे राहिलेल्या कोणत्याही वस्तूसाठी उबेर किंवा चालक जबाबदार नाहीत.
- सामान हरवल्यास उबेर मदत करू शकते, परंतु ड्रायव्हरकडे तुमचे सामान आहे ते तुम्हाला ते देऊ शकतात याची हमी देऊ शकत नाही.
हरवलेल्या वस्तूबद्दल ड्रायव्हरशी संपर्क करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना उबेर अॅपद्वारे कॉल करणे. जर ड्रायव्हर्सने उत्तर दिले आणि त्यांच्याकडे तुमचे सामान असल्याची पुष्टी केली, तर ते परत घेण्यासाठी तुम्ही दोघांनाही सोयीचे असेल अशी वेळ आणि ठिकाण सेट करा. तुमची हरवलेली वस्तू परत मिळवल्यानंतर, ड्रायव्हरचा वेळ आणि मेहनत यासाठी तुमच्या खात्यावर परतावा शुल्क आकारले जाऊ शकते.