मुक्तपीठ टीम
कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. सलग तीन दिवस देशात दररोज जवळजवळ चार हजार रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार २७० लोक कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तर त्याआधी ३ हजार ९६२ गुन्हे रूग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, ४ हजार ४१ नवीन रूग्ण संख्या नोंदवली गेली. त्यातच आता कोरोनाच्या विळख्यात पुन्हा एकदा मोठे राजकीय नेते आणि बॉलिवुडमधील सेलिब्रिटी सापडू लागले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच इतरही काही नेते आणि सेलिब्रिटी कोरोनाग्रस्त होत आहेत.
सोनिया गांधी
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
- त्यांना हलका ताप आहे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला घरी आयसोलेशन केले आहे.
- तसेच, नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात त्या ८ जून रोजी ईडीसमोर हजर राहणार आहेत, असे कांग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.
प्रियांका गांधी
- काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
- प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
- कोरोना प्रोटोकॉलनुसार मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे.
- लखनौचा दौरा आटोपून प्रियांका गांधी ०१ जून रोजी दिल्लीत परतल्या.
- त्यांनी आई सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
- प्रियांकाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
देवेंद्र फडणवीस
-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.
- त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले, त्यांना कोरोनाची लागण झाली असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.
- त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशा बातम्या आल्या.
- पण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांना अजित पवारांनी टोमणा मारल्यानंतर कोरोना झाला नसून फक्त कोरोनाचे डेड सेल सापडल्याचे जाहीर केले.
- राज ठाकरे यांना गेल्या मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे ०१ जून रोजी त्यांच्या हिपची शस्त्रक्रिया होणार होती.
- मात्र, त्याच दरम्यान ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली.
- त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
सेलिब्रिटी
अक्षय कुमार
- अलीकडेच अभिनेता अक्षय कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे.
- त्याला सौम्य लक्षणे होती आणि आता तो बरा झाला आहे. सध्या अक्षय त्याच्या पृथ्वीराज चौहान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
कार्तिक आर्यन
- अभिनेता कार्तिक आर्यन दुसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात आला आहे.
- अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियाची मदत घेऊन ही माहिती दिली आहे.
- त्यांने लिहिले की सर्व काही इतके पॉझिटिव्ह होत आहे की कोरोना टिकू शकला नाही.
- यापूर्वी, कार्तिक दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात आला होता.
आदित्य रॉय कपूर
- अभिनेता आदित्य रॉय कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे.
- कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे तो लवकर बरा होईल.
- आदित्य त्याच्या ‘ओम: द बॅटल विथ इन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता.
- हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर लॉंच करण्याची तयारीही सुरू होती. पण तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सर्व थांबले.
करण जोहरची ग्रँड बर्थडे पार्टीत कोरोनाचं रिटर्न गिफ्ट मिळाल्याची चर्चा!
काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त एक ग्रँड पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत सलमान-शाहरुखपर्यंत खूप स्टार्स सहभागी झाले होते. करण जोहरच्या या पार्टीत आलेल्या स्टार्सपैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची चर्चा आहे. अद्यापि याविषयी अधिकृत दुजोरा किंवा इंकार करण्यात आलेला नाही.
हे स्टार्स पार्टीत सहभागी झाले होते…
करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, अनन्या पांडे, विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सारा अली खान, वरुण धवन, मलायका अरोरा, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि बरेच काही हृतिक रोशनसारख्या सर्व स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.