मुक्तपीठ टीम
यवतमाळ जिह्यात उद्यापासून दुकाने सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत चालू राहणार. दुकानात पाच जणांच्या वर एकत्र जमण्यास बंदी. हॉटेल रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू राहणार. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
वाशीम जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. मास्कचा वापर न केल्यास दुकानदारासह ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजी बाजाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आठवडी बाजार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार. शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत बंद. दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
अकोला – संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असणार आहे. येत्या काळात रात्री संपूर्ण संचारबंदी लागू असेल.
अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार सायंकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत बाजारपेठा व सर्व व्यवहार बंद राहतील. आस्थापना, दुकाने रात्री आठला बंद होणार. जलतरण तलाव, इनडोअर गेम बंद. धार्मिक समारंभाला मर्यादा (केवळ पाच उपस्थितांना परवानगी).