मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या आता सातशेच्या घरात गेली आहे. मुंबईतमधील एकूण ११ वॉर्ड सध्या डेंजर झोनमध्ये आहेत. या वॉर्डांमधील कोरोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. दरम्यान रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी मृत्यूदर वाढला नसल्याने काहीसा दिलासा आहे. म्हणूनच नागरिकांनी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेतली आहे
मुंबईतले ११ वॉर्ड सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट!
- राज्यात आता कुठे कोरोनाचा धोका कमी झाला होता.
- यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले होते.
- पण या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.
- मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
- मनपाच्या माहितीनुसार, मुंबईतले ११ वॉर्ड सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.
- इथं वारंवार कोरोनाची नवीन प्रकरणं आढळून येत आहेत.
- इतकंच नाहीतर या वॉर्डांमधील करोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे.
- गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज ३०० हून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.
मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट
- वांद्रे
- खार
- कुलाबा
- परळ
- अंधेरी
- एलफिंस्टन
- माटुंगा
- ग्रँटरोड
- गोरेगाव
- चेंबूर
- कुर्ला
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७% वर!!
- या भागातील कोरोना रुग्णांचा साप्ताहिक वाढीचा दर ०.०२८ टक्के ते ०.०५२ टक्के आहे.
- तर मुंबईचा सरासरी साप्ताहिक वाढीचा दर ०.०२६ टक्के आहे.
- महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाची ७०४ नवी प्रकरणं समोर आली.
- गेल्या २४ तासात राज्यात १०४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- राज्यात गेल्या २४ तासात एकूण ४५५९ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७% एवढे झाले आहे.