Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हम रहे ना रहे…” शेवटचं गाणं…शेवटची पोस्ट! केकेचा अखेरचा श्वास…

June 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
kk singer (1)

मुक्तीठ टीम

देशातील लोकप्रिय गायक केके उर्फ ​​कृष्णकुमार कुन्नथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, केके यांनी मृत्यूआधी केलेली इन्स्ट्राग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कॉन्सर्टच्या शेवटी केके यांनी कल हम रहे न रहें कल… याद आऐंगे ये पल गाणं गायले होते. तोही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

kk singer (2)

केकेंची शेवटची पोस्ट

  • गायक केके यांनी त्यांच्या शेवटच्या परफॉर्मन्सनंतरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये केके गाणे गाताना दिसत आहे. केके यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, आज रात्री विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नाझरुल मंच’च्या स्टेजवरुन गाणी सादर करतोय, तुम्हा साऱ्यांना फार प्रेम, या कॅप्शनसह त्यांनी दोन फोटो शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KK (@kk_live_now)

दरम्यान, या कॉन्सर्टच्या शेवटी केके यांनी कल हम रहे न रहें कल… याद आऐंगे ये पल गाणं गायले होते. त्या कॉन्सर्टचे व्हिडिओ त्यांच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

kk singer (3)

केके यांचे आकस्मित निधन

  • केकेच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असतानाच तो किती तंदुरुस्त होता, मग हे कसे घडू शकते, असे चाहते म्हणतात.
  • केके यांना कॉन्सर्ट दरम्यानचं अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे कॉन्सर्टननंतर ते त्यांच्या हॉटेल रुममध्ये परतले.
  • तिथे गेल्यावर त्यांची प्रकृती जास्तचं खालावली व ते तिथेच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

kk singer (6)

केके यांची गाजलेली गाणी

  • केके यांनी १९९९ मध्ये पल हा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला होता.
  • त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत.
  • ज्यामध्ये तडप तडप (हम दिल दे चुके सनम, १९९९), दस बहाने (दस, २००५), आणि तूने मारी इंट्री (गुंडे, २०१४) सारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.
  • केकेचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुनाथ असून त्यांचा जन्म १९६८ साली दिल्लीत झाला.
  • केके यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींपासून अक्षय कुमार आणि सोनू निगम, हर्षदीप कौर आणि विशाल ददलानी यांसारख्या संगीत जगतातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

kk singer (5)


Tags: heart attackkolkataSinger KKकृष्णकुमार कुन्नथकेकेकोलकातागायक केकेहृदय विकाराचा झटका
Previous Post

इंडियन बँकेत ३१२ जागांवर करिअर संधी

Next Post

तिबेटची परंपरा, भारताची भव्यता!

Next Post
तिबेटची परंपरा, भारताची भव्यता!

तिबेटची परंपरा, भारताची भव्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!