Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीत महिलांच्या रात्रपाळीवर बंदी! योगी आदित्यनाथांचा नवा निर्णय

May 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
adityanath

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या असुरक्षिततेच्या अनेक घटना समोर येतात. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेसंबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने नोकरदार महिलांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेखी संमतीशिवाय सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर काम करण्यास भाग पाडले जाऊ शकणार नाही, असे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशात योगी सरकारने असेही म्हटले आहे की, जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याला विशेष परिस्थितीत थांबवले असेल तर त्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय महिलांना कंपनीकडून मोफत वाहने द्यावी लागणार आहेत.

ज्या कंपन्यांमध्ये महिला काम करत आहेत, त्यांनाही महिलांसाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागेल, असा आदेश योगी सरकारने दिला आहे. योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेचा विचार करून हा मोठा निर्णय घेतला आहे, असा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव कामगार सुरेश चंद्र यांनी हा आदेश जारी केला आहे. योगी सरकारच्या या निर्णयानंतर आता उत्तर प्रदेशातील कोणत्याही महिलेला रात्रीच्या शिफ्टमध्ये कामावर बोलावता येणार नाही आणि रात्री उशिरापर्यंत ड्युटी करावी लागणार नाही.

योगी सरकारचा आदेश काय सांगतो?

महिला कर्मचाऱ्यांच्या लेखी संमतीनंतरच त्यांना संध्याकाळी ७ नंतर किंवा सकाळी ६ आधी कार्यालयात बोलावले जाऊ शकते. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांनंतरही काम करायचे की नाही हे कंपनीच्या गरजेवर नव्हे तर महिला कर्मचाऱ्यांवर अवलंबून असेल. त्याचबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास संस्थांवर कारवाई करण्यात येईल.


Tags: muktpeethUttar PradeshUttar Pradesh Chief Minister Yogi Adityanathworking womanYogi Adityanath Sarkarउत्तर प्रदेशउत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथनोकरदार महिलामुक्तपीठयोगी आदित्यनाथ सरकार
Previous Post

काही साखर कारखाने बंद का पडले, याच्या खोलात जावे लागेल : शरद पवार

Next Post

कॉलेजियमकडून सहा न्यायमूर्तींच्या बदल्यांची शिफारस, काश्मिरचे धीरज सिंह ठाकूर मुंबईत!

Next Post
sc

कॉलेजियमकडून सहा न्यायमूर्तींच्या बदल्यांची शिफारस, काश्मिरचे धीरज सिंह ठाकूर मुंबईत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!