मुक्तपीठ टीम
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) २०२१ अहवाल प्रकाशित केला. या अहवालात देशातील ४८ टक्के शाळेत जाणारी मुले पायीच शाळेत जातात. केवळ नऊ टक्के मुले शालेय वाहनांचा वापर करतात ही बाब समोर आली आहे. तसेच या अहवालानुसार, ४४ टक्के शिक्षकांना पुरेशी कामाची जागा नाही, तर ६५ टक्के शिक्षकांवर कामाचा ताण आहे.
सर्व्हेक्षणात ३४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश!!
- सर्व्हेक्षणात ७२० जिल्ह्यांतील १ लाख १८ हजार शाळांमधील ३४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.
- शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एनएएस २०२१ (NAS-2021) चे आयोजन शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने केले होते.
- याआधी २०१७ मध्ये एनएएस करण्यात आले होते.
२५ टक्के पालकांचे मुलाच्या शिक्षणात सहकार्य नाही…
- ८७ टक्के विद्यार्थांचे पालक अभ्यासासाठी मार्गदर्शन करतात, तर २५ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पालकांचे सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले.
- १८ टक्के मुले सायकलने, ९ टक्के सार्वजनिक वाहनाने, ९ टक्के शालेय वाहनाने, ८ टक्के त्यांच्या दुचाकी आणि ३ टक्के चारचाकी वाहनाने शाळेत जातात.
- अहवालानुसार, ८९ टक्के मुले शाळेत शिकवलेले धडे त्यांच्या कुटुंबियांना सांगतात.
६५ टक्के शिक्षकांवर कामाचा ओझा-
- शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS)-२०२१ नुसार, ४४ टक्के शिक्षकांना पुरेशी कामाची जागा नाही, तर ६५ टक्के शिक्षक जास्त काम करतात.
- सर्वेक्षणानुसार, ५८ टक्के शिक्षकांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील चर्चेत भाग घेतला आहे.
- एनएएस २०२१ मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील १ लाख १८ हजार शाळांमधील पाच लाख शिक्षकांनी सहभाग घेतला.
- ९७ टक्के शिक्षकांनी त्यांच्या नोकऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले.
- त्यापैकी ९२ टक्के शिक्षकांनी त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी वाव व्यक्त केला.
- सर्वेक्षणानुसार, डीआयईटी (DIET), सीबीएसई (CBSE) आणि एनसीईआरटी (NCERT) द्वारे आयोजित व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये ५२ टक्के सहभागी झाले आहेत.